Crop Damage Survey : पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण

Heavy Rain Crop Loss : कृषी विभागांसह संबंधित विभागाने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण केले आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे चार तालुक्यांतील १८ हजार ३०६ शेतकऱ्यांचे ६४१३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. कृषी विभागांसह संबंधित विभागाने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण केले आहेत. या पावसामुळे ११ कोटी १३ लाखांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचा अहवाल वरिष्ठ विभागाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\

जिल्ह्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्याने वारणा आणि कृष्णा काठी महापूर आला होता. यामुळे मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यातील सोयाबीन, भुईमूग, भात, हळद, मका आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतात पाणी साचल्याने हाताशी आलेल्या पिके बाधित झाली.

Crop Damage
Crop Damage Compensation : अवकाळीच्या नुकसानीपोटी २८.७२ कोटींचा निधी मंजूर

त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी केली होती. दरम्यान, जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या तालुक्यातील बाधित झालेल्या पिकांचे कृषी विभागांसह अन्य संबंधित विभागाने पंचमाने ऑगस्‍टच्या मध्यापासून सुरवात केली. पंधरा ते वीस दिवसात बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण केले आहेत.

शिराळा तालुक्यात सर्वाधिक पिकाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १८ हजार ३०६ शेतकऱ्यांचे ६ हजार ४१३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाने पंचनामे केलेल्या अहवालात नमुद केले आहे. ६ हजार ४१३ हेक्टरवरील बाधित झालेल्या पिकांसाठी ११ कोटी १३ लाखाच्या निधीची मागणी केली आहे.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यात १२,७०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान

जुलैमध्ये अतिवृष्टी झाली. पुढे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंतही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कृषी विभागाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत झालेल्या पिकांचे पंचनामे केले आहेत. ऑगस्टच्या मध्यापासूनही पुन्हा पाऊस झाल्याने या दरम्यान ही पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाने ऑगस्टमधीलही पिकांचे किती नुकसान झाले आहे, याची माहिती घेण्यास सुरुवात केली असून त्याचेही पंचनामे केले जातील, असेही कृषी विभागाने सांगितले आहे.

जुलै महिन्यात झालेल्या पिकांचे बाधित झालेले शेतकरी संख्या व क्षेत्र दृष्टिक्षेप

तालुका शेतकरी संख्या क्षेत्र (हेक्टर)

मिरज ४०४६ २५९१

वाळवा ६२१२ १६५३

शिराळा ६७७६ १९९५

पलूस १२७२ २०३

एकूण १८३०६ ६४१३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com