Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : सोलापूरसाठी ‘उजनी’तून भीमा नदीत पाणी सोडले

Water Distribution : शहराला पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईच्या झळा तीव्र झाल्याने उजनी धरणातून शुक्रवारी (ता.१०) भीमा नदीत सहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Solapur News : शहराला पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईच्या झळा तीव्र झाल्याने उजनी धरणातून शुक्रवारी (ता.१०) भीमा नदीत सहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. या आवर्तनात सुमारे पाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. येत्या २० मेपर्यंत हे पाणी सोलापूरनजीकच्या औज बंधाऱ्यात पोहोचणार आहे.

धरणातून सकाळी पहिल्या टप्प्यात दीड हजार आणि त्यानंतर पुन्हा टप्प्या-टप्प्याने सहा हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात आला. औज बंधाऱ्यातील पाण्याने तळ गाठला आहे. परिणामी सोलापुरात पाण्याची टंचाई तीव्र होत असल्याने उजनीतून भीमा नदीत आणि आता नदीतून या बंधाऱ्यात पाणी साठवले जाणार आहे.

त्यानंतर जलशद्धीकरण प्रकल्पाद्वारे तिथून ते सोलापूरला पुरवण्यात येणार आहे. सोलापूरबरोबरच या मार्गावरील पंढरपूर, गुरसाळे, उचेठाण, चिंचपूर या भागांतील पाणी योजनांच्या परिसरातील बंधारेही भरून घेतले जाणार आहेत. जेणेकरून या भागालाही पिण्यासाठी पाणी मिळावे, हा उद्देश आहे.

धरणातील पातळी उणे ४५ टक्क्यांवर

उजनी धरणाची पाणीपातळी ही वरचेवर खाली होत चालली आहे. त्यात उन्हाच्या तडाख्याने बाष्पीभवनही मोठ्याप्रमाणात होत आहे. शनिवारी (ता.११) दुपारच्या आकडेवारीनुसार धरणात एकूण पाणीपातळी ४८६.७७५ मीटरपर्यंत आहे. त्यात ३९.२५ टीएमसी एवढा एकूण पाणीसाठा आहे. तर त्यापैकी उणे २४.४१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्याची टक्केवारी उणे ४५.५६ टक्क्यांपर्यंत पोचली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT