Dam Water Stock : साताऱ्यातील धरणातील पाण्याची स्थिती चिंताजनक

Water Shortage : सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणी स्थिती चिंताजनक झाली आहे. दुष्काळी माण, खटाव तालुक्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या सध्या उरमोडी धरणात अवघे सहा, कण्हेर १३, कोयनेत २७ टक्के, तर तारळीत ३४, धोम ३०, बलवकडीत १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
Water Dam
Water DamAgrowon

Satara News : सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणी स्थिती चिंताजनक झाली आहे. दुष्काळी माण, खटाव तालुक्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या सध्या उरमोडी धरणात अवघे सहा, कण्हेर १३, कोयनेत २७ टक्के, तर तारळीत ३४, धोम ३०, बलवकडीत १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. टंचाईवर मात करताना प्रशासनाची आगामी दीड महिने सत्त्वपरीक्षा ठरणार आहे.

Water Dam
Dam Water Stock : धरणांच्या पाणीपातळीत घट

जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे सध्या विहिरी, ओढे कोरडे ठणठणीत आहेत. काही जुन्या विहिरीत अल्प प्रमाणात पाणी आहे. सध्या जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाण्यानेही तळ गाठला आहे. तारळी, उरमोडी, कण्हेर, धोम, बलकवडी या धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. वीज निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणातही अवघा २७.३९ टीएमसी पाणीसाठी शिल्लक आहे. यामुळे सिंचनास पाणी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

प्रमुख धरणातील सुरू असलेली आवर्तने करणे अवघड होऊन बसणार आहे. त्यामुळे धरणांतील पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच अडचण होणार आहे. प्रशासन लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानात गुंतलेले असल्यामुळे त्यांचे धरणातील पाणी नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.

Water Dam
Water Crisis : जायकवाडीत उरले सात टक्के उपयुक्त पाणी

सध्या प्रमुख चार धरणांनी तळच गाठला आहे. त्यामुळे या धरणांवर अवलंबून असलेली पाणी योजना, सिंचन योजना व शेतीची अवस्था बिकट होणार आहे. आता शिल्लक असलेले पाणी पावसाळा लांबण्याची शक्यता गृहित धरून त्यांचे नियोजन करायला हवे. तरच, जूनपर्यंत मान्सून लांबल्यास तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती आहे.

गत वर्षी व सध्या पाण्याचा टीएमीसीमध्ये

धरण गतवर्षी सध्याचा

कोयना २८.३६ २७.३९

धोम ३.५५ ४.०७

बलकवडी ०.७६ ०.६८

कण्हेर २.९७ १.३२

उरमोडी ४.३७ ०.५८

तारळी ३.४६ २.०४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com