Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : संततधारेमुळे सिंधुदुर्गात पूरस्थिती

Flooding Situation : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी (ता. ७) दिवसभर झालेल्या संततधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी (ता. ७) दिवसभर झालेल्या संततधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बांदा, खारेपाटण बाजारपेठेसह जिल्ह्यातील काही बाजारपेठांत पुराचे पाणी शिरल्याने दाणादाण उडाली. मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे.

माणगाव येथील एक वृद्ध नागरिक पुरात वाहून गेला. जिल्ह्याला रविवारी संततधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली तर काही नद्या इशारा पातळीवरून वाहत होत्या. त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे या नदीचे पाणी बांदा बाजारपेठेत शिरल्यामुळे व्यापाऱ्यांची दाणादाण उडाली.

मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस, सटमटवाडी, इन्सुली, येथे पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक अडीच तास ठप्प झाली. सावंतवाडी शहरात देखील गुडघाभर पाणी साचले होते. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्याला मुसळधारेचा मोठा दणका बसला. या भागातील बहुतांश मार्गावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे या भागातील २७ गावांचा संपर्क तुटला. माणगाव येथील दत्ताराम भोई आंबेरी पुलावरून वाहून गेले.

जिल्ह्यातील १५ हून अधिक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने त्या कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले. मालवणमध्ये अडकलेल्या वीस जणांना रेस्क्यू टीमने सुरक्षित बाहेर काढले. जिल्ह्यातील शेकडो एकर भातशेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. याशिवाय भेडशी मार्गावरून पुराच्या पाण्यातून वाहून गेलेल्या बोलेरोतील तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आहे. सोमवारी (ता. ८) सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. परंतु खारेपाटण शहरात अद्याप पाणी आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस

देवगडमध्ये २१६.८ मिमी, मालवण २२०.९, सावंतवाडी २७०.५, वेंगुर्ला २२४.५, कणकवली १८४.४, कुडाळ २१५.५, वैभववाडी १५६.६, दोडामार्गमध्ये १६७.४ मिमी पावसाची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT