Maharashtra Rain : समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला

Paddy Farming : इगतपुरी तालुक्यासह त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार व समाधानकारक पावसामुळे मुख्य पीक असलेल्या भाताच्या आवणीला वेग आला आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Igatpuri News : इगतपुरी तालुक्यासह त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार व समाधानकारक पावसामुळे मुख्य पीक असलेल्या भाताच्या आवणीला वेग आला आहे. मधूनच पावसाची रिपरिप सुरू असल्याने अनेक भागांत भातशेतीला प्रारंभ झाला. संपूर्ण तालुका जणू हिरवाईच्या शालूने नटला आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने चौफेर हजेरी लावल्यामुळे भात लागवडीला (आवणीला) सर्वत्र उत्साहात सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच काही ठिकाणी ट्रॅक्टर, तर काही ठिकाणी आजही पारंपरिक पद्धतीने शेतकरी लागवड करताना दिसून येत आहे. पाऊस चांगल्या प्रमाणात होत असल्यामुळे शेतकरी खरिपाच्या कामात व्यस्त झालेला दिसून येत आहे.

Rain Update
Monsoon Rain : पावसाचा जोर २ दिवस राहणार; राज्यातील बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज

इगतपुरी तालुका हा भात पिकासाठी अग्रेसर व प्रसिद्ध आहे. भातासाठी पोषक वातावरण असल्यामुळे प्रामुख्याने इंद्रायणी, गरी कोळपी, १००८, वाय.एस.आर हळे, पूनम डीएस १००, ओम ३, सेंच्युरी, ओम श्रीराम १२५, रुपाली, रुपम, विजय, आवणी, लक्ष्मी, खुशबू, सोनम, दप्तरी, वर्षा, राजेंद्र, बासमती आदी प्रमुख भाताच्या जाती तालुक्यात घेतल्या जातात.

भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या इगतपुरीत भात शेती मोठ्या प्रमाणात होते. मात्र भात शेतीचा वाढता खर्च बघितला तर ते देखील करणे मुश्किल होत आहे. आज खतांच्या वाढणाऱ्या किमती, बी-बियाणे, औषधे हे वापरून शेतकरी मेटाकुटीस आला असून, खतांच्या किंमतीत दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढ होत आहे. भाताला दरवर्षी भाव आहे तोच राहतो.

Rain Update
Weekly Weather : हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

त्यामुळे भातशेतीचा खर्च वाढतच असल्याची भावना शेतकरी वर्गात आहे. भात रोपांच्या खणणीला एक दिवस लागतो. दुसऱ्या दिवशी रोपांचे चूड बांधून बांधावर ठेवले जातात. त्यानंतर बैलजोडी नांगराच्या किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखल केला जातो. त्यानंतर भाताच्या लागवड प्रक्रियेला प्रारंभ होतो. या प्रक्रियेला भात आवणी संबोधले जाते. आदिवासी त्यास चिखली असेही म्हणतात.

आदिवासी गाण्यांनी दुमदुमला परिसर

आदिवासी भागात आवणी कामांच्या दरम्यान गाणी म्हणून कामे केली जातात. एकमेकांच्या मदतीला जाऊन आवणीची कामे पूर्ण केली जातात. इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरच्या पश्‍चिम व आदिवासी भागासह पूर्व भागातही यंदा रोपांची चांगली वाढ झाल्याने सगळीकडे आवणीला सुरवात झाली आहे. त्र्यंबकेश्‍वर परिसरातील गिरणारे, वाघेरा, वेळुंजे, गणेशगाव, रोहिले, हिरडी, माळेगाव आदी भागात आवणीची कामे जोर धरू लागली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com