Nashik News : नाशिक : गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने १९३ कोटी ८ लाख ८४ हजार ६४६ रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. पण, तहसील कार्यालयांच्या कासवगती कारभारामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप मदत जमा होऊ शकलेली नाही. त्यामुळे अगोदरच निसगनि तडाखा दिलेल्या बळीराजासमोरील संकटाचा डोंगर कायम आहे.
जिल्ह्यात २०२४ मध्ये मॉन्सूनने सरासरी गाठली. ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दूर सरला. पण त्याचवेळी ११ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुका वगळता अन्य सर्व तालुक्यांना तडाखा दिला. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा शेतीपिकांना बसला होता.
जिल्ह्यात एक लाख चार हजार हेक्टरवरील कांदा, भात, टोमॅटो, द्राक्ष, भाजीपाला व अन्य पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे तब्बल एक लाख ८२ हजार ३९० शेतकऱ्यांना फटका बसला हसूल प्रशासनाने कृषीच्या सहाय्याने पंचनामे करत बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १९३ कोटी लाख लाख ८४ हजार ६४६ रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविली होती.
राज्य शासनाने २८ फेब्रुवारीला राज्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे अनुदान मंजूर केले. त्यानुसार नाशिक जिल्ह्याला मागणीनुसार अनुदान एकाच टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आले. त्या मुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, तहसील कार्यालये शेतकऱ्यांचे ई-केवायसी व कागदपत्रांच्या पूर्ततेत विलंब करीत आहेत. परिणामी वीस दिवसांपासून जिल्ह्याला निधी प्राप्त होऊनही तो बँक खात्यात जमा झाला नाही.
४७,१९१ जणांची माहिती भरली
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांची ई-केवायसी व इतर माहिती शासनाच्या संकेतस्थळावर भरणे बंधनकारक आहे. यंत्रणांनी आजमितीस एक लाख ८२ हजार ३९० शेतकऱ्यांपैकी केवळ ४७ हजार १९१ माहिती संकेतस्थळावर भरली आहे. संबंधित शेतकऱ्यांना ४२ कोटी १८ लाख ४८ हजार ३३७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पण, काही तांत्रिक बाबींची पूर्तता बाकी असल्याने निधी शेतकऱ्यांच्य खात्यात वर्ग झाला नसल्याची माहिती मिळते आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.