
Nashik News : नाशिक : जिल्ह्यात ऑक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एक लाख ८२ हजार ३७४ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने १९३ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.
ऑक्टोबरच्या ११ ते १९ या कालावधीत देवळा, सटाणा, चांदवड, इगतपुरी व सुरगाण्याला अतिवृष्टीने झाली. काही ठिकाणी अवघ्या काही तासांमध्ये ढगफुटीसदृश पावसाची नोंद झाली. त्यामुळे शेतीपिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. तब्बल एक हजार ७१३ गावांमधील एक लाख ४ हजार ७९४ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली.
त्यामुळे एक लाख ८२ हजार ३७४ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यात मका पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असून तब्बल ३७ हजार ४२१ हेक्टरवरील पीक मातीमोल झाले. तर तब्बल २९ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रावरील कांदापीक वाया गेले आहे. २१ हजार ९१२ हेक्टर भात, १९,२२९ हेक्टर सोयाबीन, ४ हजार १८३ हेक्टर द्राक्ष, ३४५ हेक्टर डाळिंब, ३५२ हेक्टर इतर भाजीपाला तसेच अन्य पिकांचीही हानी झाली आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असली तरी त्या दरम्यान विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजला. त्यामुळे आचारसंहितेत नुकसानीचे पंचनामे रखडले होते. आता निवडणुका पार पडल्या असून शासनदेखील गठित झाले आहे. त्यामुळे महसूल प्रशासन व कृषी विभागाने पंचनाम्याची कामे पूर्ण करताना नुकसानीचा अंतिम अहवाल तयार केला आहे. त्यानुसार कोरडवाहू क्षेत्रावरील ७० हजार १३४ हेक्टर, बागायतीचे ३० हजार ८८ तसेच बहुवार्षिक फळपिकांचे ४ हजार ५७२ हेक्टर असे एकूण एक लाख ४ हजार ७९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी १९३ कोटी ७ लाख ८३ हजार रुपयांची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव आता शासनस्तरावर सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार ३३ टक्क्यांवरील नुकसानीसाठी हेक्टरी आर्थिक मदत अंतिम केली आहे. त्यानुसार कोरडवाहुकरिता २७ हजार रुपये प्रतिहेक्टर याशिवाय फळपिकांसाठी १३ हजार ६०० तर बहुवार्षिक फळपिकांकरिता ३६ हजार रुपये हेक्टरी मदत शासन करते.
नुकसानीचे आकडे व मागणी
प्रकार बाधित गावे शेतकरी संख्या क्षेत्र (हेक्टर) अपेक्षित निधी (लाखांत)
कोरडवाहू १००६ १२६४६० ७०१३४.२६ ९५,३८.२६
बागायत ३६८ ४८७११ ३००८८.४१ ८१,३२.८७
बहुवार्षिक फळपीक ३३९ ७२०३ ४५७१.३८ १६,४५.७०
एकूण १७१३ १८२३७४ १०४७९४.००५ १९३,०७.८३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.