Poultry  Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Farming : मत्स्यपालन, कुक्कुटपालन सल्ला

Fisheries : मत्स्यशेती करतेवेळी माशांची वाढ आणि पाण्याची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी प्रजैविकांचा वापर करावा. तर अंड्यावरील कोंबडी (लेअर) संगोपनासाठी जागेची निवड करताना येणारे ऊन, वारा व पावसाची दिशा विचारात घ्यावी.

Team Agrowon

Fishery and Poultry Business : मत्स्यपालन

ढगाळ हवामानामध्ये तलावातील प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. परिणामी, मत्स्यशेतीमध्ये प्राणवायूचे प्रमाण कमी होते. अशा स्थितीमध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. यामध्ये एरिएटर उपलब्ध असल्यास सकाळी व संध्याकाळच्या वेळेस दोन तास एरिएटर चालवावे किंवा पंपाच्या साह्याने शेततळे/तलावातील पाणी फिरवावे किंवा बांबूच्या काठीने पाणी हलवून घ्यावे. पाणी हलविल्याने पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.

मत्स्यशेती करतेवेळी माशांची वाढ आणि पाण्याची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी प्रजैविकांचा वापर करावा. खाद्य देतेवेळी प्रजैविकाची भुकटी सहा ग्रॅम प्रति किलो खाद्य या प्रमाणात खाद्य ओलसर करून वापरावी. जेल किंवा तेल स्वरूपामध्ये प्रजैविके असल्यास ती खाद्याला चोळून वापरावी. तलावातील पाण्याची गुणवत्ता उत्तम राखण्याकरिता मातीतून देण्यात येणाऱ्या प्रजैविकांचा १० किलो प्रति हेकटर याप्रमाणात अथवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वापर करावा.

सदर चिखलाचे ५० ग्रॅम वजनाचे छोटे गोळे करून त्यात प्रजैविके भुकटी मिसळून घ्यावे. असे चिखलाचे गोळे तलावात टाकावेत. आपल्या विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्र अथवा जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागामध्ये किंवा नजीकच्या मत्स्य सेवा केंद्रामध्ये ही प्रजैविके सहज उपलब्ध होऊ शकतात. मत्स्य सेवा केंद्राची माहिती व पत्ता मिळविण्यासाठी जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाशी संपर्क करता येईल.

कुक्कुटपालन

अंड्यावरील कोंबडी (लेअर) संगोपनासाठी जागेची निवड करताना येणारे ऊन, वारा व पावसाची दिशा विचारात घ्यावी. स्वच्छ, निर्जंतुक व खेळती हवा आणि विजेचा सातत्यपूर्ण पुरवठा असणारी जागा निवडावी. निरोगी वाढीसाठी हे अत्यंत आवश्यक असते.

अंड्यावरील कोंबड्याचे (लेअर) संगोपन डीप लिटर (गादी पद्धत) अथवा पिंजरा पद्धतीने करावे. डीप लिटर पद्धतीमध्ये जमिनीवर ३ ते ५ इंच जाडीचा भुस्सा, तूस, टरफल इ. साहित्याचे लिटर पसरावे.

नवीन पिले आणावयाच्या आधी ब्रूडर तयार करून ठेवावे. ब्रूडरचे तापमान साधारणत: ३० ते ३५ अंश सेल्सिअस इतके असावे. पिले आणल्याबरोबर त्यांना ब्रूडरमध्ये ठेवून पसरट भांड्यामध्ये भरडलेला मका सर्वसाधारण तीन दिवसांपर्यंत द्यावा. पिण्यासाठी पाण्याचे पसरट भांडे ठेवावे.

पिले ब्रूडरपासून लांब जाऊ नयेत म्हणून ब्रूडरभोवती ३० ते ४० सें.मी. अंतरावर १५ इंच उंचीचे गोलाकार चिकगार्ड ठेवावे. पिले जसजशी मोठी होतील, तसतसे वर्तुळ मोठे करावे. पहिले ३ ते ४ दिवस पिले गादीवर अंथरलेल्या कागदावर सोडावीत. कागद रोज बदलावा.

ब्रूडरमध्ये आर्द्रतेचे प्रमाण ५० ते ६० टक्के असावे. जास्त आर्द्रतेमुळे लिटर ओलसर राहून त्यात रोगजंतू निर्माण होतात, त्यामुळेलिटर दातेरी पंजाने ढवळण्याची काळजी घ्यावी.

कुक्कुटपालनासाठी पिले खरेदी करताना त्यांना मॅरेक्स रोगप्रतिबंधक लस दिल्याची खात्री करून घ्यावी. लसीकरण केले नसल्यास अंड्यावरील कोंबडीच्या (लेअर) एक दिवस वयाच्या पिलांना मॅरेक्स रोगप्रतिबंधक लस ०.२ मि.लि. त्वचेखाली पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने द्यावी.

डॉ. व्ही. जी. मोरे, : ०२३५८-२८२३८७

(ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT