Kharif Season 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season 2025 : खरीप नियोजनात प्रथमच क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना संधी ; कृषी सहायक, पर्यवेक्षकांची होणार राज्यव्यापी कार्यशाळा

Kharif Management : आगामी खरीप हंगामाच्या नियोजनात राज्यातील निवडक क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. नियोजनात आतापर्यंत केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सामील केले जात होते.

मनोज कापडे

मनोज कापडे

अॅग्रोवन वृत्तसेवा

Kharif Season : पुणे : आगामी खरीप हंगामाच्या नियोजनात राज्यातील निवडक क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. नियोजनात आतापर्यंत केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सामील केले जात होते.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे व्यस्त असलेले कृषी आयुक्तालय सध्या दुसऱ्या बाजूने ‘खरीप २०२५’ची जोरदार तयारी आतापासून करीत आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, येत्या सात व आठ एप्रिल रोजी पुण्यात कृषी विभागाची विशेष राज्यस्तरीय कार्यशाळा होणार आहे. या वेळी कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडून कृषी संचालकांसह राज्यातील सर्व विभागीय कृषी सहसंचालक (जेडीए), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ), ‘आत्मा’च्या जिल्हा प्रकल्प संचालकांचा आढावा घेतला जाणार आहे.

...म्हणून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा समावेश

राज्यस्तरीय कार्यशाळा होताच शक्य झाल्यास लगेच कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यासह सचिव, आयुक्त पुन्हा दुसरी कार्यशाळा घेणार आहेत. खरीप नियोजनात उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकाऱ्यांसह राज्यातून निवडक कृषी सहायक व पर्यवेक्षकांनाही सामील करुन घेतले जाणार आहे. ‘‘क्षेत्रीय कर्मचारी थेट गावशिवारात शेतकऱ्यांमध्ये काम करतात. योजनांबाबत धोरणात्मक अडचणी त्यांना लवकर समजतात. त्यामुळे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनाही नियोजनात समाविष्ट करण्याच्या सूचना आम्हाला देण्यात आल्या आहेत,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

वेळेत आढावा घेतला तरच नियोजन शक्य

क्षेत्रिय कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर कृषी विभागाने राज्यातील कृषी विद्यापीठांसोबत विभागस्तरावर स्वतंत्र बैठका घेण्याचे ठरवले आहे. त्यानंतर पुन्हा उपविभागाचा आढावा घेत विधिमंडळ सदस्यांसोबत तालुकास्तरावर आढावा बैठका घेण्याचे नियोजन आहे. तालुका पातळीवरील बैठका संपताच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्यात खरीप आढावा सभा घेतली जावी. मात्र त्यात निश्‍चित झालेले नियोजन गावशिवारात पोहोचविण्यासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनीदेखील गावस्तरीय बैठका घ्याव्यात, असे सुचविण्यात आले आहे. ‘‘राज्यात मॉन्सूनचे आगमन होण्याच्या एक दोन आठवडे आधी खरीप आढाव्याची प्रक्रिया पूर्ण झाली तरच नियोजनाचा उपयोग होतो. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी राज्याच्या खरीप आढाव्याची मुख्य बैठक मेच्या अखेरपर्यंत व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे,’’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

दोन हजार कर्मचाऱ्यांसोबत बैठक

खरीप आढावा आणि कृषी विभागाची वाटचाल अशा दोन्ही मुद्द्यांभोवती केंद्रीत असलेली कृषी विभागाची राज्यव्यापी बैठक येत्या नऊ एप्रिल रोजी पुण्याच्या बालेवाडी येथील सभागृहात घेतली जाणार आहे. यात दोन हजारांपेक्षा जास्त क्षेत्रिय कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसे नियोजन सध्या कृषी आयुक्तालयाकडून चालू आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT