Team Agrowon
आगामी खरीप हंगामाची चाहूल लागली आहे. खरीपपूर्व मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग व आत्मा यंत्रणेच्या पुढाकाराने गावोगावी खरीपपूर्व शेतकरी सभा घेतल्या जात आहेत.
शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी घरच्या घरी सोयाबीन उगवण चाचणी कशी करावी याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येत आहे.
तसेच कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजानांची माहितीही या माध्यमातून दिली जात आहे.
याशिवय जमीन आरोग्य पत्रिका, पीकविमा, बियाणे प्रक्रिया, खरीप पिकाची लागवड, सेंद्रिय शेती, नॅनो युरिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादित केलेल्या सोयाबीन बियाण्यांची लागवड करण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे याची संपूर्ण माहिती दिली जात आहे.
कृषी विभागाने गावोगावी बैठकांचे नियोजन केले आहे. कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ, तालुका कृषी अधिकारी, आत्माचे कर्मचारी, कृषी विज्ञान केंद्रांचे तज्ज्ञ या ग्राम बैठकांना उपस्थित राहून खरीपपूर्व नियोजनाबाबत मार्गदर्शन करीत आहेत.