Forest Fire Agrowon
ॲग्रो विशेष

Pench Tiger Reserve : पेंच प्रकल्पात वापरणार ‘फायर डिटेक्शन सिस्टीम’

Forest Fire : जंगलातील वणव्यावर तातडीने नियंत्रणासह आगीची माहिती मिळावी म्हणून पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘फायर डिटेक्शन सिस्टीम’चा वापर करण्यात येणार आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : जंगलातील वणव्यावर तातडीने नियंत्रणासह आगीची माहिती मिळावी म्हणून पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘फायर डिटेक्शन सिस्टीम’चा वापर करण्यात येणार आहे. वणव्याबद्दल तातडीने संदेश देणारी यंत्रणा लावणारा पेंच हा देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे. यामुळे पेंच प्रकल्पातील ७० ते ८० टक्के वनक्षेत्रावर लक्ष ठेवणे सुलभ होणार आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पाने बंगळूरूच्या एका कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. या यंत्रणेचा वापर सध्या अमेरिकेतील ॲमेझॉनच्या जंगलातही केला जात आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प फाउंडेशन आणि फॉरेस्ट फायर टेक्नॉलॉजी (एफएफटी) यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार झाला आहे.

जंगलातील आग शोधणे, ती विजवणे, उपायांची अंमलबजावणी आणि व्यवस्थापन ब्राझील-आधारित उमग्रामीओ ही कंपनी करीत आहे. ही कंपनी मूळ ॲमेझॉनच्या जंगलात वाढत्या वणव्याला तोंड देण्यासाठी काम करीत आहे.

कोलितमारा (पूर्व पेंच रेंज) मध्ये ५५ लाख रुपयांचा प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. या जंगलात उन्हाळ्यात आगीचा धोका असतो. तो कमी करण्यासाठी लवकरच ही सेवा सुरू करण्यात येत आहे.

उपकरणे खरेदीसाठी संपूर्ण खर्च आणि इंटिग्रेशन, कंट्रोल रूम आणि टॉवर मॉनिटरिंग सिस्टम इन्स्टॉलेशन, सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन आणि चाचण्या आणि ट्रेनिंगचा सीएसआर फंडातून खर्च करण्यात येणार आहे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया (एसएसआय) जंगलातील आगीबाबत सूचना देत असले, तरी पेंच येथील नवीन तंत्रज्ञान रिअल-टाइम अलर्ट देईल आणि पेंचच्या जवळपास संपूर्ण क्षेत्रावर लक्ष ठेवेल.

...असे करेल काम

धूर, आगीच्या घटनांचे नेमके स्थान आदींची माहिती मिळावी म्हणून छायाचित्रांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आलेला आहे. डिटेक्शन सिस्टीमच्या मुख्य उपकरणांमध्ये हाय-रिझोल्यूशन मॉनिटरिंग कॅमेरे, ३५०-वॉट सोलर पॅनेल, रात्री आणि ढगाळ दिवसांमध्ये सिस्टीम चालू ठेवणाऱ्या बॅटरी आणि टॉवर्समधून देखरेख केंद्राकडे प्रतिमा पाठविण्यासाठी रेडिओ आणि अँटिनाचा वापर केला आहे.

संपूर्ण जंगलाचा अभ्यास केल्यानंतर कंपनीने प्रकल्पासाठी भू-जोखीम आणि इतर घटकांच्या आधारेच या भागाची निवड केली आहे. प्रकल्पामध्ये एक मॉनिटरिंग टॉवर आहे. ते संयुक्तपणे एक लाख हेक्टर जंगलाचे संनियंत्रण सक्षमपणे करू शकते. त्याद्वारे वर्तुळाकार २० किलोमीटर क्षेत्रावर नियंत्रण करता येईल. जंगलातील आग लवकर शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
- डॉ. प्रभू नाथ शुक्ल, क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Institute : सभासदांना १८ टक्के लाभांश देणार ः ठोंबरे

Rain Crop Damage : शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा गेल्या ‘पाण्यात’

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

SCROLL FOR NEXT