Forest Fire : वणवा लावणाऱ्यांची माहिती कळवा अन् बक्षीस मिळवा

Forest Department : वनसंपदेची लूट करण्यासाठी जंगलांना आग लावली जाते. वन्य प्राण्यांची शिकार केली जाते.
Forest Fire
Forest FireAgrowon

Pune News : वनसंपदेची लूट करण्यासाठी जंगलांना आग लावली जाते. वन्य प्राण्यांची शिकार केली जाते. वन संपदा आणि वन्य जीव वाचविण्यासाठी अखेर वन विभागाला बक्षीस जाहीर करावे लागले आहे. वणवा लावणाऱ्यांची आणि शिकार करणाऱ्यांची माहिती कळवा अन् बक्षीस मिळवा, अशी योजनाच वन विभागाने जाहीर केली आहे.

अलीकडील महिन्यांमध्ये जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वन्यजीवांचा अधिवास असलेल्या ठिकाणी वणवे लागण्याच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे वनसंपदा नष्ट होऊ लागली आहे. तसेच चोरट्या शिकारीच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. वणवा आणि धुराचा त्रास वन्यजीव प्राण्यास, तसेच मानवालाही होऊ लागला आहे.

Forest Fire
Forest Fire : आग लावणाऱ्याला शिक्षा हवीच

मावळ तालुक्यातील सह्याद्री पर्वतांच्या डोंगररांगा शापित होऊ लागल्या आहेत. पर्यायाने डोंगररांगांचे सौंदर्य, त्यामधील विपुल वनसंपदा नष्ट होऊ लागली आहे. ९९ टक्के वणवे हे मानवनिर्मित असतात, असे वन विभागाचे म्हणणे आहे. या वणव्यांमध्ये परिपक्क झालेला ‘रानमेवा’ वणव्यांमुळे नष्ट होतोय.

Forest Fire
Forest Fire : कोल्हापुरात चार महिन्यांत ८० वणवे

गावरान फळे, फुले, छोटे सरपटणारे प्राणी, पशु, पक्षी व अन्य वन्यजीवांनाही या वणव्याच्या आगीत जीव गमवावा लागतो. काही प्राणी या वणव्याच्या आगीत होरपळत आहेत. तसेच काही ठिकाणी डुकरांच्या शिकारीसाठी फटाके टाकून ठेवले जातात, या फटाक्यांच्या स्फोटात अनेकदा पाळीव प्राण्यांचाही बळी जातो.

नागरिकांनी वनात स्वयंपाक करू नये, वनक्षेत्रात बीडी, सिगारेट ओढून त्याची थोटके फेकू नयेत, वनांलगत शेतातील पालापाचोळा, उसाचे पाचट जाळू नये, रात्री वनातून जाताना हातात टेंभा, पलिते, कंदील घेऊन जाऊ नये, त्याऐवजी बॅटरी वापरावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

‘जंगलात आग लावल्यास भारतीय वन अधिनियम १९२७ चे २६ (१) ब आणि क तसेच क्न्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार दंडनीय अपराध आहे. त्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास आणि २५ हजार रुपये दंड होऊ शकतो. तसेच वणवा आणि शिकारींबाबत १९२६ या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
- हनुमंत जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com