Forest Fire : सातपुड्यात आग लागते की लावली जाते?

Forest Department : वन विभाग व जंगलतोड करणाऱ्यांमध्ये काही साटेलोटे तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
Forest Fire
Forest FireAgrowon

Jalgaon News : सातपुडा पर्वत रांगांमध्ये डिसेंबर ते मार्च, एप्रिल महिन्यांत जोरदार वणवा पेटतो. दुरूनच आगीच्या उजेडामुळे सातपुडा पर्वत भयावह दिसतो. पर्वतात मध्य प्रदेशातील बरेचसे लोक बेकायदेशीर घरे बांधून राहतात आणि सर्रास वृक्ष तोडतात. हे लोक शेती करण्याच्या हेतूने मुद्दामपणे जाणीवपूर्वक आग लावतात. अनेक वेळा पुराव्यासह याविषयी माहिती समोर येऊनही वन विभागाचे प्रशासन त्याचा काहीच बंदोबस्त करीत नसल्यामुळे प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

तर काही लोक हेतुपुरस्सर जंगलात आग लावून मोठमोठी झाडे पाडतात. ते पूर्णपणे वाळल्यावर जवळील गावांमध्ये त्या लाकडांची विक्री करताना दिसून येत असतात. या गोष्टींकडे वन अधिकारी व कर्मचारी निमूटपणे पाहत राहून दुर्लक्ष करतात. त्यामुळे सातपुड्यात आग लागते की लावली जाते, असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडला आहे.

Forest Fire
Forest Fire : आग लावणाऱ्याला शिक्षा हवीच

वन विभाग व जंगलतोड करणाऱ्यांमध्ये काही साटेलोटे तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. काही लोक पावसाळ्यात उगवलेले गवत उन्हाळ्यात सुकून गेल्याने या ठिकाणी जंगलात जाण्यासाठी असलेल्या पायवाटा मोकळ्या करण्यासाठी आगी लावून देत असल्याचे वनप्रेमींचे म्हणणे आहे.

राजकीय दबावापुढे वनाधिकारी हतबल

सातपुड्यात परराज्यांतील लोकांनी येऊन जंगलातील नवाळ काढून शेती तयार करून या ठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत. मात्र वनाधिकारी राजकीय दबावापुढे अतिक्रमित लोकांवर काही कारवाई करीत नाहीत. राजकीय पदाधिकारी आपल्या मते मिळण्यासाठी परराज्यांतील अतिक्रमित झालेल्या लोकांना प्रोत्साहन देत असल्याचे बोलले जात आहे.

Forest Fire
Forest Fire : सातपुड्यात वणव्याच्या घटनांमुळे वृक्षांची हानी

धावडी वृक्ष नामशेष होणार

सातपुडा पर्वताच्या रावेर, यावल, चोपडा या भागांत धावडी वृक्षापासून डिंक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असते. शासनाने सातपुड्याच्या परिसरातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, म्हणून जंगलात डिंक गोळा करण्यासाठी मुभा दिली आहे. मात्र काही लोक डिंकाचे उत्पादन जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी धावडी वृक्षाला डिंक निघण्यासाठी असणारे इंजेक्शनचा अतिरेकी वापर करतात.

यामुळे या वृक्षाला धोका निर्माण झाला असून, अतिप्रमाणात दिलेल्या इंजेक्शनने झाडाला इजा होऊन ते नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धावडी वृक्षावरोबरच कालाई, कड, कादबधा या झाडांनाही इंजेक्शन देऊन डिंक मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे सातपुडा पर्वतातून या झाडांचे अस्तित्व कायमचे नष्ट होणार आहे. वन विभागाने अतिरेक होत असलेल्या इंजेक्शनवर अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी वनप्रेमींकडून केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com