Mazi Ladki Bahin Yojana  Agrown
ॲग्रो विशेष

Maharashtra Budget 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला पात्र? दरमहा मिळणार १५०० रुपये

Mazi Ladki bahin Yojana : महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सूरू केली आहे. राज्याने महिला धोरण जाहीर केले आहे. यामध्ये वेळोवेळी बदलही करण्यात आले.

Mahesh Gaikwad

Pune News : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना २०२४-२५ आर्थिक वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री म्हणून पवार यांनी आपल्या कारकिर्दीतील १० वा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील महिलांना केंद्रस्थानी ठेवून मध्यप्रदेशच्या धरतीवर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची घोषणा पवार यांनी केली.

यावेळी पवार म्हणाले की, महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सूरू केली आहे. राज्याने महिला धोरण जाहीर केले आहे. यामध्ये वेळोवेळी बदलही करण्यात आले. राज्य सरकारने नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर केले आहे.

महिलांना पोषण आहार, रोजगार, कौशल्य विकासाठीच्या योजना राबविण्यात येणार आहेत. याशिवाय लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, पंतप्रधान मातृ योजना आपण आणल्याचे पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी राज्य सरकार दरवर्षी ४६ हजार कोटी खर्च करणार आहे. या योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून करण्यात येणार आहे.

याशिवाय राज्यातील महिलांसाठी घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करातून सूट, शक्ती योजना यासारख्या योजना राबविण्यात येत आहे, असेही पवार म्हणाले.

दरम्यान, अर्थसंकल्प सादर करताना पवार यांनी सर्वसामान्य महिलांना दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचीही घोषणा केली. या योजनेनुसार, महिलांना वर्षांला तीन सिंलेंडर गॅस मोफत देण्यात येणार आहेत. या योजनेचा फायदा ५२ लाख कुटुंबांना होणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT