Union Budget : अर्थसंकल्प जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात

Budget Update : केंद्रातील रालोआ-३ सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सादर केला जाण्याची शक्यता आहे.
Union Budget
Union BudgetAgrowon

New Delhi : केंद्रातील रालोआ-३ सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सादर केला जाण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा निर्मला सीतारामन यांच्याकडे आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून अर्थसंकल्प सादर केला जाईल.

Union Budget
Interim Budget 2024 : अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचे बुडबुडेच

‘रालोआ’ सरकारचा पुढील पाच वर्षांचा आर्थिक अजेंडा सीतारामन यांच्याकडून देशासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प सादर होण्यास सव्वा महिन्याचा कालावधी बाकी असल्याने अर्थ मंत्रालयाकडून अर्थसंकल्पावर काम सुरु झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Union Budget
Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प राज्याला दिवाळखोरीकडे नेणारा

अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर नेणे तसेच २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. त्यादृष्टीने अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जाऊ शकतात. रिझर्व्ह बॅंकेकडून अलीकडेच सरकारला २.११ लाख कोटी रुपयांचा लाभांश मिळाला होता. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक नवीन योजना हाती घेतल्या जाऊ शकतात.

२२ जून रोजी जीएसटी परिषदेची बैठक

दरम्यान, नव्या सरकारमधील पहिल्या जीएसटी परिषदेची बैठक २२ जून रोजी होत आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीचा अजेंडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. याआधीची जीएसटी परिषदेची बैठक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com