Transformer Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Transformer : शेतीपंप, डीपी बिघाडावर ‘कपॅसिटर’चा उतारा

Agriculture Electricity Issue : रोहित्र बिघाड होण्याचे प्रमुख कारण म्हणजे रोहित्रावरील अतिरिक्त भार होय. यावर कृषी पंपावर कपॅसिटर वापरणे हा एक अतिशय प्रभावी उपाय म्हणून पुढे येतो आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : अनिश्चित वीजपुरवठ्यामागील कारणांमध्ये मुख्य मुद्दा हा रोहित्र तथा ‘डीपी’मध्ये उद्भवणारे बिघाड हा आहे. रोहित्र बिघाड होण्याचे प्रमुख कारण म्हणजे रोहित्रावरील अतिरिक्त भार होय. यावर कृषी पंपावर कपॅसिटर वापरणे हा एक अतिशय प्रभावी उपाय म्हणून पुढे येतो आहे.

माहितीनुसार, कपॅसिटरच्या वापरामुळे व्होल्टेज सुधारते व विद्युतप्रवाह (करंट) कमी होतो. परिणामी पंप व रोहित्र बिघाड होण्याचे प्रमाण कमी होते हे वाशीम, लातूर, नांदेड जिल्ह्यांतील पथदर्शी प्रयोगातून दिसून आले आहे. सिंचनासाठी अनिश्चित वीजपुरवठा ही शेतकऱ्यांना सध्या भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक प्रमुख समस्या आहे.याचे निराकरण करण्यासाठी आयआयटी मुंबई, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, कृषी विभाग आणि महावितरण यांच्यामार्फत बीड व वर्धा या जिल्ह्यांतील निवडक गावांमध्ये विजेसंबंधी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

वाशीम जिल्ह्यातील मनभा व उंबरडा (ता. कारंजा), नांदेड जिल्ह्यातील धानोरा मक्ता (ता. लोहा), लातूर जिल्ह्यातील उमरगा येल्लादेवी (ता. अहमदपूर) या गावांमध्ये हा उपक्रम यशस्वी झाला. सद्यःस्थितीत शेतीपंपावर कपॅसिटर वापराबाबत शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती नाही. दोन फेजच्या वीज लाइनचे रूपांतर तीन फेज करणारा जो कपॅसिटर (गड्डे) असतो त्यापेक्षा या उपक्रमातील कपॅसिटर वेगळा व अधिक लाभदायी आहे. याचा वापर तीन फेज असताना कृषिपंपावर करण्यात येतो.

बीड, वर्धा जिल्ह्यांतील दहा गावांत उपक्रम

आयआयटी मुंबईच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सहा आणि वर्धा जिल्ह्यातील चार गावांमध्ये कृषीपंपावर कपॅसिटर वापराचे प्रात्यक्षिक दाखविणे सुरू आहे. बीड जिल्ह्यात बागपिंपळगाव, रुई, एकरूका, पिपळवंडी, शिवणी व तिगाव, तर वर्धा जिल्ह्यामध्ये रोहना, जुनोना, नंदपूर व कान्होली या गावांत हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत निवडलेल्या रोहित्रावरील सर्व शेती पंपावर आयआयटीमार्फत कपॅसिटर बसवले जात आहेत.

परिणामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा सल्ला

प्रात्यक्षिकामध्ये योग्य कपॅसिटरची निवड कशी करावी, त्याची जोडणी/वापर व त्याचे परिणाम उदा. व्होल्टेज सुधारणे, करंट कमी होणे, पाण्याचे प्रवाह वाढणे हे शेतकऱ्यांसमोर प्रत्यक्ष दाखवले जात आहेत. ज्या गावात सदर उपक्रम सुरू आहे त्याचे परिणाम पाहण्यासाठी उर्वरित शेतकऱ्यांनी वरील गावातील निवडलेल्या रोहित्रांना अवश्य भेट द्यावी. याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एका शेतकऱ्याने कपॅसिटर लावला तर थोडासा फायदा होतो, मात्र एका ‘डीपी’वरील सर्व शेतकऱ्यांनी कपॅसिटर लावले तर उत्तम परिणाम दिसतात. म्हणजेच हा शेतकऱ्यांनी सामूहिकपणे करायचा उपक्रम असल्याने रोहित्रावरील सर्व शेतकऱ्यांचा सहभाग असणे यात गरजेचे आहे.
विजय कोळेकर, मृदा विज्ञान तज्ज्ञ, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तुर दरावर दबाव कायम; वांग्याच्या दरात सुधारणा, डाळिंब व मोहरी वधारली, बाजरीचा भाव स्थिर

Maize Snail Attack : उगवत्या अंकुरावर गोगलगायींचे आक्रमण

Cucumber Farming : खरीप काकडीचे अधिक उत्पादन शक्य

Adhala Dam : अकोला तालुक्यातील आढळा धरण भरले; शेतकरी सुखावला

Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पर्यावरणस्नेहीं ५ लाख ग्राहकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT