
Sangli News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील एक लाख पाच हजार शेतकऱ्यांना ९४८ कोटी ८७ लाखाचे कर्जवाटप केले आहे. उद्दिष्टाच्या ७८ टक्के कर्जपुरवठा केला असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.
खरीप हंगामातील पेरणीसाठी बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग असते. त्यासाठी त्यांना जून महिन्यापूर्वीच पीककर्ज मिळणे गरजेचे असते. परंतु मे आणि जूनमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरण्यांना विलंब झाला आहे.
तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्का व्याज आकारले जाते. जिल्हा बँकेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात अन्य राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा मोठा वाटा असतो. सध्या बँकेकडून खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, ऊस, कापूस, द्राक्षे, डाळिंब, हळद व इतर पिकांना कर्ज वाटप करण्यात येत आहे.\
या वर्षी खरिपासाठी सांगली जिल्हा बॅंकेसाठी ११३३ कोटी ५६ लाख कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. यापैकी आतापर्यंत ९४८ कोटी ९२ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. हे प्रमाण उद्दिष्टाच्या ७८ टक्के आहे.
या पीककर्ज वाटपास सप्टेंबर अखेर मुदत असल्याने बँक उद्दिष्टापेक्षा जास्त कर्ज वाटप करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत एक लाख पाच हजार १३८ शेतकऱ्यांना कर्जवाटप केले आहे. कर्जवाटपासाठी सप्टेंबरअखेर मुदत आहे.
तालुकानिहाय पीककर्ज वाटप
तालुका वाटप कर्ज (रुपये) शेतकरी संख्या
शिराळा ५३.८० कोटी १२०२१
वाळवा १३२.९३ कोटी १५८८०
मिरज १३६.८५ कोटी १२२२७
कवठे महांकाळ १०९.४२ कोटी १२६७१
जत १०४.७९ कोटी १६३३०
तासगाव १२५.९१ कोटी ८४८२
खानापूर ६६.३३ कोटी ५४०७
आटपाडी ६७.३० कोटी ८७४२
पलूस ६७.३५ कोटी ५९६४
कडेगाव ९४.१८ कोटी ७४१४
एकूण ९४८.८६ कोटी १,०५,१३८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.