Agriculture Electricity : सोलापूर जिल्ह्यात गाव, शेतीसाठी विजेची स्वतंत्र लाईन

Electricity Issue : शेतीचा भार दिवसेंदिवस वाढत असून गावातील कुटुंबाची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या ट्रान्सफॉर्मवरील भार क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने सतत वीज खंडित होण्याची समस्या उद्भवत आहे.
Agriculture Electricity
Agriculture ElectricityAgrowon
Published on
Updated on

Solapur News : गावांचा, शहरांचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढली, पण विजेची यंत्रणा पूर्वीचीच आहे. त्यामुळे सध्याच्या फिडरवरील ट्रान्सफॉर्मरवर (डीपी) क्षमतेपेक्षा अधिक भार झाल्याने सतत वीज खंडित होत आहे.

या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात शेती आणि गावासाठी वीजेची स्वतंत्र लाईन टाकली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या ‘सुधारित वीज वितरण प्रणाली’ योजनेतून जिल्ह्यातील साडेसात हजार डीपींची क्षमता वाढविली जाणार आहे.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : गडचिरोली जिल्ह्यात मिळणार शेतीला दिवसा वीजपुरवठा

शेतीचा भार दिवसेंदिवस वाढत असून गावातील कुटुंबाची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या ट्रान्सफॉर्मवरील भार क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने सतत वीज खंडित होण्याची समस्या उद्भवत आहे. जिल्ह्यातील ५४ हजार ट्रान्स्फॉर्मरपैकी तब्बल सात हजार ५४५ ट्रान्सफॉर्मरवर सद्य:स्थितीत क्षमतेपेक्षा जास्त भार आहे.

त्याठिकाणी आता ६३ केव्हीए ट्रान्सफॉर्मर बदलून १०० केव्हीएचा बसविला जाणार आहे. २०० केव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरच्या बाजूलाच दुसरा १०० केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजन आहे. केंद्राच्या योजनेमुळे वीज खंडित होण्याची नेहमीच कटकट आता बंद होणार आहे. शेती व गावठाण (गाव) यांची विजेची लाईन स्वतंत्र करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. पाच वर्षांत ही कामे संपवून नागरिकांना विनाखंडीत वीज मिळेल.

Agriculture Electricity
Electricity Transformer : अकोला परिमंडलात रोहित्र बिघडण्याचे प्रमाण झाले कमी

प्रिपेड मीटर येणार

‘सुधारित वीज वितरण प्रणाली’तून राज्यात युद्धपातळीवर कामे सुरु आहेत. सुरुवातीला शेती व गावांची लाईन स्वतंत्र करण्याचे काम पूर्ण झाल्यावर सर्व ग्राहकांना प्रिपेड मीटर बसविले जाणार आहे. राज्यातील अडीच कोटी ग्राहकांना ते मीटर बसविले जातील.

शेतीपंपाला मात्र हे मीटर बसविले जाणार नाहीत. प्रिपेड मीटर बसविल्यानंतर ग्राहकांनी जेवढे पैसे भरले, तेवढीच वीज मिळणार आहे. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारच्या 'सुधारित वीज वितरण प्रणाली' योजनेच्या माध्यमातून शेती व इतर ग्राहकांची विजेची लाईन स्वतंत्र करण्याचे काम सुरु आहे. दुसरीकडे ओव्हरलोडेड ट्रान्स्फॉर्मरची क्षमता देखील वाढविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रिपेड मीटर बसविले जातील.
रमेश राठोड, कार्यकारी अभियंता, महावितरण, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com