Ginger Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Management : आले पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन

अरुण देशमुख

Drip Irrigation of Ginger Crop : आले पिकासाठी जमिनीचा सामू ५.५ ते ७.५ असावा. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण एक टक्क्यावर असावे. भुसभुशीत जमीन पिकाच्या योग्य वाढीसाठी उपयुक्त असते. आले पिकाच्या मुळांशी योग्य तितकाच ओलावा असावा. हे पीक ओलाव्याबाबत खूपच संवेदशील आहे.

शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी व खते मिळण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक नळीतील अंतर, ड्रीपरमधील अंतर आणि ड्रीपरचा ताशी प्रवाह तपासावा. ठिबक सिंचन प्रणालीमुळे पाणी, अन्नद्रव्ये कार्यक्षम मुळाच्या कक्षेत दिली जातात. पाणी वापरात ५० टक्के आणि रासायनिक खतात ३० टक्के बचत होते. पिकाची जोमदार आणि एकसमान वाढ होते.

जमिनीतील पाणी, अन्न आणि हवा यांचे संतुलन राखता येते. ठिबक सिंचनाद्वारे पाणी सुरू असताना भरणी, फवारणी करता येते. पीक उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ मिळते. माती परिक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.

खत व्यवस्थापन

लागवडीनंतरचे दिवस खत प्रकार

प्रमाण किलो

(प्रति दिन प्रति एकर) एकूण

३० ते ६० युरिया १.२५ ३७.५

१२:६१:०० १.२५ ३७.५

पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश ०.७५ २२.५

६१ ते १०० अमोनियम सल्फेट २ ८०

१२:६१:०० १ ४०

पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश १.२५ ५०

१०१ ते १४० युरिया १.५ ६०

पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश १.५ ६०

फॉस्फेरिक आम्ल ०.७५ ३०

१४१ ते २०० युरिया १ ६०

पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश १.२५ ७५

टीप :

मॅग्नेशिअम सल्फेट २.४ किलो प्रति एकरी आठवड्यातून एक वेळा द्यावे.

कॅल्शिअम नायट्रेट ४ किलो प्रति एकरी आठवड्यातून एक वेळा १३० दिवसांपासून द्यावे.

७५ दिवसांनी भरणीच्या वेळी प्रति एकरी द्यावयाची खते

खताचा प्रकार किलो / एकर

डीएपी ५०

अमोनियम सल्फेट ५०

एसओपी ५०

सूक्ष्म अन्नद्रव्ये १०

निंबोळी पेंड २००

अरुण देशमुख, ९५४५४५६९०२

(उपसरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Floriculture : शेतकरी नियोजन : फुलशेती

Narendra Modi and Rahul Gandhi : निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी राज्यात

Fruit Crop Insurance : आंबिया बहरातील फळपिकांसाठी विमा योजना

Flood Affected Farmer : महापूर बाधित शेतकऱ्यांना मिळणार पैसे, कोल्हापूर कृषी विभागाकडून याद्या अपलोडींगचे काम सुरू

Nandurbar Earthquake : नंदुरबार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

SCROLL FOR NEXT