MAFSU : म्हशीच्या श्‍वसननलिकेपासून कॉन्ड्रॉयटिन सल्फेट

MAFSU Research : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातील तज्ज्ञांनी म्हशीची श्‍वसननलिका आणि कानातील कॉर्टिलेजपासून कॉन्ड्रोइटिन सल्फेट तयार केले आहे.
MAFSU
MAFSUAgrowon

Nagpur News : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातील तज्ज्ञांनी म्हशीची श्‍वसननलिका आणि कानातील कॉर्टिलेजपासून कॉन्ड्रोइटिन सल्फेट तयार केले आहे. या संशोधनास भारतीय पेटंट कार्यालयांतर्गत (बौद्धिक संपदा कायदा) पेटंट मिळाले आहे.

या बाबत माहिती देताना मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशूतज्ज्ञ डॉ. विलास वैद्य म्हणाले की, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कापणीपश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत आम्ही कॉन्ड्रॉयटिन सल्फेट निर्मितीचे संशोधन पूर्ण केले. ऑस्टियोआर्थरायटिस हा मानवामध्ये आढळून येणारा आजार आहे.

MAFSU
MAFSU Protest : ‘माफसू’चा प्रस्तावित डिप्लोमा रद्द करण्यासाठी आंदोलन

यामध्ये हाडांची झिज होऊन ठिसूळ होतात. हा आजार जागतिक पातळीवर अपंगत्वाचे चौथे प्रमुख कारण आहे. सांधेदुखी आणि जडपणा ही आजाराची सामान्य लक्षणे आहेत. कॉन्ड्रोइटिन सल्फेट हे ऑस्टियोआर्थरायटिस आणि हाडांच्या आजारावर उपचार करण्यासाठी वापरले जाते.

कॉन्ड्रोइटिन सल्फेटचा अर्क कत्तलखान्यातील प्राण्यांच्या मृदू कॉर्टिलेजपासून तयार केला जातो. (उदा. म्हशीचे कान, शार्क माशाचे कार्टिलेज) मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ विभागातील तज्ज्ञांनी म्हशीची श्‍वसननलिका आणि कान यांच्या कॉर्टिलेजमधून कॉन्ड्रोइटिन सल्फेट तयार करण्याची प्रक्रिया विकसित आणि प्रमाणित केली. या संशोधनाला पेटंट मिळाले आहे.

MAFSU
MAFSU : वन्यजीवांविषयी जाणण्यासाठी चला ‘माफसू’च्या संग्रहालयात

या संशोधनामध्ये योजना प्रमुख डॉ. रवींद्र झेंडे, माजी कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, उपयोजना प्रमुख डॉ. विलास वैद्य, डॉ. रुपेश वाघमारे आणि शास्त्रज्ञ डॉ. राजेश वाघ यांचे प्रमुख योगदान आहे.

या संशोधनासाठी ‘माफसू’चे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये, संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे, विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने आणि महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. सरिता गुळवणे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com