Dr. Gajanan Ghadade Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Sanvad : हळद, सोयाबीनच्या अधिक उत्पादकतेसाठी खत व्यवस्थापन हवे

Team Agrowon

Parbhani News : हळद व सोयाबीनची उत्पादकता वाढीसाठी काटेकोर खत व्यवस्थापन करावे लागेल. मुख्य अन्नद्रव्ये खते तसेच सूक्ष्म मूलद्रव्येयुक्त विद्राव्य खतांचा वापर करावा. पिकांमध्ये सर्वेक्षण करून कीड तसेच रोग व्यवस्थापन केल्यास फवारणीवर होणारा अनावश्यक खर्च टाळता येतो, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी केले.

‘सकाळ अॅग्रोवन व कोरोमंडल इंटरनॅशनल’ लि. यांच्या तर्फे सिनगी-नागा (ता. सेनगाव) येथे गुरुवारी (ता. २५) सकाळी आयोजित हळद व सोयाबीन पीक खत व्यवस्थापन या विषयावरील ‘अॅग्रोवन संवाद’ चर्चासत्रामध्ये ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी माजी पोलिस पाटील निवृत्ती गिते होते. कोरोमंडल इंटरनॅशनल लि.चे कृषी विद्यावेत्ता सचिन पाटील, सहाय्ययक व्यवस्थापक (विपणन) जोतिबा माने, विपणन अधिकारी ऋषिकेष सागडे, तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे, हरीश झंवर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय तोष्णीवाल, डॉ. नारायणदास तोष्णीवाल, ‘अॅग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी सुरेश पाचकोर, पोलिस पाटील शिवाजी गिते, मारोती गिते,

मंडळ कृषी अधिकारी सांरग घुगे, कृषी सहायक गोपाळ शेवाळे, उद्धव गिते, परमेश्‍वर विधाते, देविदास जाधव आदी उपस्थित होते. डॉ. गडदे म्हणाले, की बेणे प्रक्रिया करुन हळदीची पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीवर लागवड करावी. बेणेप्रक्रियेमुळे कीड, रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. कंद माशी, कंदकुज, हुमणी आदींसह बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये निर्मिती बायोमिक्स या जैविक घटक वापर परिणामकारक ठरत आहे.

ठिबक सिंचन संचाव्दारे पाणी व विद्राव्य खते द्यावीत. निंबोळी अर्काचा वापर करावा. सोयाबीनची पेरणी बीजप्रक्रिया करूनच करावी. शेंगा भरण्याच्या कालावधीत विद्राव्य खतांची फवारणी करावी. उंट अळी, लष्करी अळी आदी किडींचे सर्वेक्षण करून फवारणीचा निर्णय घ्यावा. उत्पादकतेसाठी जमिनीचे आरोग्य जपण्याची गरज आहे. माने म्हणाले, की नॅनो तंत्रज्ञानाद्वारे निर्मित खतांचा वापर करावा. पाटील म्हणाले, की सोयाबीनसाठी गंधकयुक्त खतांचा वापर करावा. त्यामुळे शेंगातील दाणे भरुन वजन वाढते. उत्पादकता वाढते.

वळकुंडे म्हणाले, की रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाला सहकार्य करावे. प्रास्ताविक व सूत्रसंचालन अॅग्रोवनचे जिल्हा बातमीदार माणिक रासवे यांनी केले तर आभार पांडुरंग इंगळे यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT