Organic Fertilizers : पाणी धारणा क्षमता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवा

Agriculture Update : जमिनीचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. तापमानाच्या चढ-उतारानुसार द्राक्ष बागेस नत्र व खते पुरवठा केला पाहिजे. द्राक्षेवेलीचे बोथावर लक्ष ठेवून पाणी हे आतमध्ये मुरत असल्याबद्दल खात्री करावी.
Organic Fertilizers
Organic FertilizersAgrowon

Nashik News : जमिनीचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. तापमानाच्या चढ-उतारानुसार द्राक्ष बागेस नत्र व खते पुरवठा केला पाहिजे. द्राक्षेवेलीचे बोथावर लक्ष ठेवून पाणी हे आतमध्ये मुरत असल्याबद्दल खात्री करावी. माती पाणी परीक्षण करावे. मातीची पाणी धारणा क्षमता वाढविण्यासाठी जैविक व सेंद्रिय खतांची योग्य मात्रा द्यावी, असे मत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणेचे डॉ. ए. के. उपाध्याय यांनी केले

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे ओझर मिग (ता.निफाड) येथील येथील द्राक्ष भवनात झालेल्या ‘खरड छाटणी द्राक्ष व्यवस्थापन’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. उपाध्याय बोलत होते. राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले हे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे संचालक माणिकराव पाटील, विभागीय अध्यक्ष अॅड. रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख, संचालक अॅड रवींद्र बोराडे, डॉ. डी. एस. यादव, डॉ. सुजाय साहा आदी उपस्थित होते

Organic Fertilizers
Agriculture Sowing : नांदेडमध्ये सरासरीच्या पुढे पेरणी

डॉ. यादव यांनी खोडकिड ही द्राक्षवेलीची प्रमुख समस्या असल्याने जुलै, ऑगस्टमध्ये द्राक्षवेलीची साल काढावी. फळ छाटणीचे वेळी दर दहा दिवसांत मिलिबग्ज बघून द्राक्षवेलीला तीव्र दाबाने फवारणी केली तर धुतले तर पिंक बेरीची समस्या उभी राहते. त्यासाठी कमीत कमी रसायनांचा वापर केला पाहिजे असे सांगितले.

Organic Fertilizers
Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

डॉ. सुजाय साहा यांनी डाऊणी भुरी या रोगाचे नियंत्रण बुरशीजन्य करपा जिवाणूजन्य करपा या विषयावर माहिती दिली. भोसले यांनी द्राक्ष उत्पादन विक्री व निर्यातीपुढील आव्हानाचा सामना करताना चव व द्राक्षाच्या टिकवण क्षमतेवर भर देण्याचे आवाहन केले. विभागीय अध्यक्ष अॅड रवींद्र निमसे यांनी प्रास्ताविक केले. मानद सचिव बाळासाहेब गडाख यांनी सूत्रसंचालन केले.

संचालक सुरेशमामा कळमकर, बबनराव भालेराव, कैलास पाटील, रावसाहेब रायते, नंदकुमार पानगव्हाणे, अॅड. रामनाथ शिंदे, किशोर निफाडे, सागर बोरस्ते, विजय घुमरे, बबलू मोरे, भारत सोनवणे, सोमनाथ पडोळ, वैभव तासकर, ईश्वर महाले, सोपान बोराडे, राजेंद्र भालेराव, नंदू पडोळ, व्यवस्थापक योगेश गडाख, संतोष मापारी, जयराम पडोळ आदींसह द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक मंडळ उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com