Dr. Hanumant Garud
Dr. Hanumant Garud Agrowon

Agrowon Sanvad : एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

Dr. Hanumant Garud : पीक व्यवस्थापनात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत खामगाव कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. हनुमंत गरुड यांनी व्यक्त केले.
Published on

Beed News : शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत तसेच हिरवळीच्या पिकांचा वापर केल्याने जमिनीचा पोत सुधारतो, तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. पीक व्यवस्थापनात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत खामगाव कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. हनुमंत गरुड यांनी व्यक्त केले.

‘सकाळ-ॲग्रोवन’ व ‘कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव (ता. गेवराई) येथे शनिवारी (ता. २०) आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. गरुड म्हणाले की, रायझोबियम, पीएसबी, ॲझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया करावी. पेरणी सोबत शिफारशीनुसार जमिनीत खते पेरून द्यावीत.

Dr. Hanumant Garud
Agrowon Sanvad : हळद पीक उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

माती परीक्षण अहवालानुसार पिकाला रासायनिक खतांची मात्रा द्यावी. फवारणीच्या माध्यमातून विद्राव्य खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. शेतकऱ्यांनी दर तीन वर्षांतून एकदा माती परीक्षण करावे. त्यामुळे आपल्या जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता लक्षात येते. त्यानुसार खतांची मात्रा ठरवता येते.

Dr. Hanumant Garud
Agrowon Sanvad : सोयाबीन, कापसामध्ये मृत सरी काढा : डॉ. गरुड

कोरोमंडलचे पीकतज्ज्ञ बाबूराव वाघमोडे म्हणाले, की युरियाचा वापर शिफारशीप्रमाणे योग्य प्रमाणातच केला पाहिजे. नत्र, स्फुरद सोबत पालाशचा वापर अवश्य करावा. त्यामुळे बोंडांचे वजन वाढते, धाग्याची गुणवत्ता सुधारते. जमिनीतून द्यावयाच्या खतांची कार्यक्षमता कमी आहे.तसेच यांची उपलब्धता खते दिल्यानंतर २० ते २५ दिवसांनी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नॅनो डीएपीसारख्या विद्राव्य खतांचा वापर करावा.

त्यामुळे खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होते. त्यांनी कोरोमंडलच्या विविध उत्पादनांची सविस्तर माहिती दिली. या वेळी कोरोमंडलचे विभागीय व्यवस्थापक सूर्या रेड्डी, विपणन अधिकारी ललित पाटील, रमेश नागरगोजे, राहुल लोखंडे, वितरक बाबुराव गाडे, सरपंच रंगनाथ घोलप, बंडू अप्पा घोलप, नागोराव घोलप, शिवाजी घोलप उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित वाणी यांनी केले, विजय पवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com