Parbhani News : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात जुलै अखेर ९५ हजार ११ टन खतांचे आवंटन मंजूर आहे. परंतु प्रत्यक्षात ६८ हजार ९४५ टन खतांचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे डीएपी तसेच इतर ग्रेडच्या खतांचा तुटवडा आहे. शेतकऱ्यांची नड लक्षात घेऊन अनेक ठिकाणचे विक्रेते जादा दराने विक्री करत आहेत.
जुलै अखेर डीएपीचे १४ हजार ७३० टन आवंटन मंजूर असतांना ४ हजार ८१३ टन पुरवठा झाला. युरियाचे २८ हजार ३३५ टन आवटंन मंजूर असताना १७ हजार ३९२ टन पुरवठा झाला. पोटॅशचे १ हजार २३१ टन आवंटन मंजूर आहे परंतु पुरवठा नाही.
एनपीके संयुक्त खतांचे ४० हजार ६४० टन आवंटन मंजूर असताना ३७ हजार ४३ टन पुरवठा झाला. सिंगल सुपर फॉस्फेटचे १० हजार ७५ टन आवंटन मंजूर असतांना ९ हजार ६९५ टन पुरवठा झाला.खरीप हंगाम २०२५ साठी परभणी जिल्ह्याला विविध ग्रेडची १ लाख ४५ हजार ११४ टन रासायनिक खते मंजूर केली आहेत.
मागणी पेक्षा १४ हजार ५८६ टन कमी परंतु खरीप २०२४ च्या तुलनेत २१ हजार ८१४ टन अधिक खते मंजूर आहेत. यंदा १ एप्रिलपासून आजवर पर्यत विविध ग्रेडच्या ६८ हजार ९४५ टन खतांचा पुरवठा झाला. ३१ मार्च अखेर शिल्लक ४७ हजार ९४२ टन मिळून एकूण १ लाख १६ हजार ८८८ टन खते उपलब्ध होती. त्यापैकी ७९ हजार ९० टन खतांची विक्री झाली. कृषी विभागाच्या भरारी पथकांकडून कारवाई केली जात आहे.
विक्री परवाने ठराविक कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. परंतु त्यानंतरही खतांची जादा दराने विक्री सुरुच आहे. खतांचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांची गरज व मागणी लक्षात घेऊन जून महिन्यात संरक्षित खतसाठा (बफर स्टॉक) मधून डीएपी ४१८ टन आणि युरिया १ हजार २५० टन मिळून एकूण १ हजार ६६८ टन खते खुली करण्यात आली होती.
खत मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी
यंदा मे महिन्यापासून डीएपी खत मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. कृषी सेवा केंद्रांवर दर्शनी भागात खतसाठा फलक दररोज अद्ययावत केले जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्या केंद्रावर उपलब्ध खतसाठ्याची माहिती मिळत नाही.
डीएपी, १०ः२६ः२६ यासह अनेक ग्रेडच्या खतांचा तुडवडा आहे. खत विक्रेते साठेबाजी लिंकिंग केली जात आहे. एमआरपीपेक्षा ४०० ते ५०० रुपये जास्त दराने खताची विक्री करून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.