Fertilizer Smuggling : गोंदियातून मध्य प्रदेशात खतांची तस्करी उघड

Fertilizer Shortage : राज्यभरात युरिया आणि डीएपी खतांची मोठी मागणी आहे. तुलनेत राज्यातील सर्वच जिल्ह्यांत या खतांचा पुरवठा कमी झाला आहे.
Fertilizer Stock Update
Fertilizer Stock UpdateAgrowon
Published on
Updated on

Gondia News : राज्यातील शेतकऱ्यांची खतासाठी मारामार सुरू असतानाच गोंदिया जिल्ह्यातून खताच्या तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील खताची मध्य प्रदेशात तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन कृषी सेवा केंद्र संचालकांसह पाच जणांविरोधात आमगाव पोलिसांनी रविवारी (ता. १३) पहाटे साडेचारच्या सुमारास गुन्हा दाखल केला. सुमारे ४३ हजार रुपयांचा खतांचा साठाही जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\

राज्यभरात युरिया आणि डीएपी खतांची मोठी मागणी आहे. तुलनेत राज्यातील सर्वच जिल्ह्यांत या खतांचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर खतासाठी भटकंतीची वेळ आली आहे. त्यातच कंपन्यांकडून युरिया आणि डीएपी खतांचा पुरवठा करावयाचा असल्यास इतर अनावश्‍यक उत्पादने घेण्याची सक्‍ती केली जाते. त्यामुळे शेतकरी आणि व्यावसायिक हवालदील झाले आहेत. मात्र या संधीचा फायदा घेत काही व्यावसायिकांनी जादा दराने खताच्या विक्रीतून शेतकऱ्यांची लूट चालविली आहे.

Fertilizer Stock Update
Fertilizer Shortage : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खत तुटवडा दूर

गोंदिया जिल्ह्याच्या सीमा या मध्य प्रदेशशी जुळलेल्या आहेत. या जिल्ह्यातील कृषी केंद्र व्यावसायिकांनी तर थेट खताची तस्करी करीत त्यातून जादा परतावा मिळविण्याचा गोरखधंदा चालविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांना मात्र खतांच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भाने वाढत्या तक्रारींची दखल घेत गोंदिया व मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांनी सीमेवर संयुक्‍त तपासणी मोहीम हाती घेतली होती.

त्यानुसार शनिवारी रात्री ४३ हजारांचा खत साठा महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर जप्त करण्यात आला. या कारवाईत मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील शैलेंद्र सुरेंद्रकुमार दमाहे (घनसा), सुभाष रमेश येंडे (पाथरगाव), विनोद अशोक तांभोरे (बिजली) यांच्यासह कृषी केंद्र व्यावसायिक प्रकाश रोशनलाल अग्रवाल (संचालक मंगल कृषी केंद्र, म्हाली, आमगाव, गोंदिया), अशोककुमार रामप्रसाद गुप्ता (जय दुर्गा कृषी केंद्र, आमगाव, गोंदिया) अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अत्यावश्‍यक वस्तू अधिनियम कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली.

Fertilizer Stock Update
Fertilizer Linking : खतांच्या लिकिंग प्रकरणात शासनाने हस्तक्षेप करावा

या माध्यमातून खतांच्या तस्करीवर शिक्‍कामोर्तब झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश कानवडे यांच्या मार्गदर्शनात आमगाव तालुका कृषी अधिकारी महेंद्र दिहारे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संतोष सातदिवे, खुदीराम सनोदीया (उपविभागीय कृषी अधिकारी, लांजी, बालाघाट, मध्य प्रदेश) यांनी केली. पॉस मशिनमध्ये कोणतीही नोंद न घेता तसेच पावती न देताच या खतांचा बेकायदा पुरवठा करण्यात आल्याचेही चौकशीत समोर आले.

खतांच्या ४५ बॅग जप्त

शनिवारी (ता. १२) मध्यरात्री तीन वाहनांच्या माध्यमातून युरिया आणि डीएपी खताची तस्करी केली जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्याआधारे कारवाई करण्यात आली. यात २०:२०:०:१३ या खताच्या २८ बॅग, केपीआर कंपनीद्वारे उत्पादित सिंगल सुपर फॉस्फेटच्या पाच बॅग, चम्बल फर्टिलायझर्स कंपनीद्वारे उत्पादित युरियाच्या चार बॅग, कस्तुरचंद फर्टिलायझर्स कंपनीद्वारे उत्पादित १८:१८:१० या खताच्या चार बॅग, तसेच कृषीधन कंपनीच्या २०:२०:० या खताच्या ४ बॅग याप्रमाणे ४३ हजार रुपयांचा खत साठा जप्त करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com