Nashik News : इगतपुरी येथे न्यायालयाच्या आदेशानंतर सात-बारा उताऱ्यावरील नोंद रद्द करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महिला ग्राममहसूल अधिकारी व मंडल अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
योगिता धुराजी कचकुरे (वय ४२, रा. सोमेश्वर कॉलनी, नाशिक), दत्तात्रय मनोहर टिळे (वय ३५, रा. टिळकपथ, भगूर) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. यातील योगिता कचकुरे यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली असून, दत्तात्रय टिळे फरारी असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.\
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३९ वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मौजे मोडाळे येथे वडिलोपार्जित जमीन असून, मिळकतीच्या गावनमुना सातवर (अधिकार अभिलेख पत्रक) इतर अधिकारांमध्ये न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्रयस्थ संबंधास प्रतिबंध अशी फेरफार नोंद होती.
या अर्जावर कार्यवाही करून न्यायालयाच्या आदेशानुसार नोंद रद्द करून नवीन नोंद घेण्याच्या मोबदल्यात लाचखोर अधिकारी कचकुरे हिने दहा हजारांच्या लाचेची मागणी केली होती. मंडल अधिकारी दत्तात्रय टिळे याने नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागितली.
पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला. त्यात कचकुरे हिला लाचेची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक संदीप घुगे, हवालदार गणेश निंबाळकर, संतोष गांगुर्डे, नितीन नेटारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.