Chandrapur Bribery Case : थकित बिलासाठी लाच मागणारा अभियंता गजाआड

Bribe Arrest News : जिल्ह्यातील जिवती येथील तक्रारदार आहे. तो व्यवसायाने कंत्राटदार आहे. त्याने राज्य शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिवती आणि राजुरा तालुक्यातील २३ गावांमध्ये पाणीपुरवठ्यासंदर्भात कामे केली.
Bribery Arrest News
Bribery ArrestAgrowon
Published on
Updated on

Chandrapur News : थकित देयक काढून देण्यासाठी चार लाखांची लाच मागणारे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बोहरे यांच्यासह याच विभागातील वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार आणि परिचर (कंत्राटी) मतीश शेख या लाचखोरांनाही अटक झाली आहे. जिल्ह्यातील जिवती येथील तक्रारदार आहे. तो व्यवसायाने कंत्राटदार आहे. त्याने राज्य शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिवती आणि राजुरा तालुक्यातील २३ गावांमध्ये पाणीपुरवठ्यासंदर्भात कामे केली.

या कामांतील दहा गावातील कामांची देयके जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे थकित होती. त्याच्या मंजुरीसाठी त्यांनी देयके सादर केली. त्यापैकी पाच गावांचे एकूण ४३ लाख रुपयांचे देयक तक्रारकर्त्याला मिळाले. ही काढून दिलेली आणि उर्वरित देयकांसाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बोहरे यांनी स्वतःसाठी चार लाख रुपयांची मागणी केली.

Bribery Arrest News
Bribery Arrest : सरपंचाच्या पतीला हजार रुपयांची लाच घेताना रंगहात अटक

ही रक्कम वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार याच्याकडे देण्यास सांगितले. तसेच गुंडावार यानेही वीस हजार रुपयांची मागणी केली. एकूण चार लाख वीस हजार रुपये लाचेची मागणी अभियंता आणि सहायकाने केली. तक्रारकर्त्याला लाच द्यायची नव्हती. त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर ७ आणि ९ एप्रिलला पडताळणी करण्यात आली.

Bribery Arrest News
Bribery Arrest : जमीन मोजणीचा नकाशा देण्यासाठी शिपायाने मागितली लाच

तेव्हा बोहरे आणि गुंडावार या दोघानेही लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार सापळा लावण्यात आला. रात्री अकरा वाजताच्या सुमाराला गुंडावार याने चार लाख वीस हजार रुपये स्वीकारले. त्यापैकी वीस हजार रुपये स्वतःसाठी काढून ठेवले.

चार लाख रुपयांची रक्कम पाणीपुरवठा विभागातील परिचर (कंत्राटी) मतीन शेख याला बोहरे यांना देण्यास सांगितले. शेखने ती रक्कम बोहरे यांच्या घरी नेवून दिली. या तिघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्यावर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही अटक झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com