Pest Infestation  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Quality Issue : किडीमुळे भातपिकाचा दर्जा खालावण्याची भीती

Pest Infestation : काही दिवसांपासून महाड तालुक्यामध्ये पावसाने दडी मारली असून मोठ्या प्रमाणात ऊन पडत असल्याने भातशेती संकटात सापडली.

Team Agrowon

Mahad News : काही दिवसांपासून महाड तालुक्यामध्ये पावसाने दडी मारली असून मोठ्या प्रमाणात ऊन पडत असल्याने भातशेती संकटात सापडली. महाडमधील भात शेतीवर खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाला असल्याचे कृषी विभागाने केलेल्या कीड रोग सर्वेक्षणाअंतर्गत दिसून आले. शेतकऱ्यांनी या खोडकिडीचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

एका बाजूला महाड तालुक्यात भात शेतीचे क्षेत्र घटत असतानाच दुसरीकडे मात्र लहरी हवामानाचा फटकादेखील भात पिकाला बसत आहेत. काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे तर काही वेळा तुरळत पाऊस पडत आहे. परंतु ऊन पडू लागल्याने शेतातील पाण्याचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. भात पीक धोक्यात येऊ शकते खबरदारीचा उपाय म्हणून कृषी विभागाकडून कीडरोग सर्वेक्षणअंतर्गत महाडमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे.

कृषी विभागाने सुचविलेले उपाय

किडीच्या व्यवस्थापनाकरिता क्विनॉलफॉस २ मिली प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी किंवा फिप्रोनील ०.३% दाणेदार कीटकनाशक २०८ ग्रॅम प्रतिगुंठा या प्रमाणात जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना वाळूमध्ये किंवा युरिया खतामध्ये मिश्रण करून भात शेतीमध्ये वापरावे. असे आवाहन जीवन आरेकर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले.

खोडकिड म्हणजे काय?

भात पीक कापणीनंतर हा किडा कोष अवस्थेत राहतो. दुसऱ्या वर्षाच्या पेरणीनंतर पोषक वातावरण मिळाल्यानंतर यामधून पतंग बाहेर पडून साधारणतः तो किडा दीडशे ते दोनशे अंडी घालतो.

अळ्या तयार झाल्यानंतर भाताच्या खोडात जाऊन कोंब खाण्यास सुरवात करतात.

भात वाढीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास भाताचे मधले पाते पिवळे, लालसर होऊन त्यांची सुरळी होते. याचा भात पिकावर परिणाम होतो.

पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे, अशा शेतकरी बांधवांनी पिक विमा इन्शुरन्स ॲपमध्ये नोंद करावी. Inundation (पाणी साचलेले) आहे, असे कारण दाखवावे. तसेच आपल्या शेतातील फोटो टाकून तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदणी करताना काही अडचण आल्यास संबंधित गावाचे कृषी सहायक व विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क करावा.
विशाल इंगळे, कृषी सहाय्यक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT