Irrigation Water Update: पावसाअभावी पिके करपण्याच्या मार्गावर असताना घोड धरणाच्या रब्बी हंगामातील आवर्तनाला सुरुवात झाली आहे. चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणाच्या डाव्या व उजव्या अशा दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात आल्याने शिरूर तालुक्याच्या पूर्व भागासह अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आवर्तनामुळे रब्बी हंगामातील पिकांना संजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे..घोड धरणाच्या लाभक्षेत्रात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनानेही या भागाचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश केला आहे. पाण्याअभावी शेतातील पिके करपू लागली होती..Water Conservation Work: जलसंधारणाच्या नऊ कामांचे कृषी विभागाकडे हस्तांतर; दुष्काळी स्थितीमुळे सात महिन्यापुरता शासनाने घेतलेला निर्णय.विहिरी व विंधनविहिरींची पाणीपातळी खालावल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. घोडच्या डाव्या कालव्याची लांबी ८४ किलोमीटर असून, त्यातून ४५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे..तर उजव्या कालव्यातून १५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणात सध्या ८८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, हे आवर्तन सरासरी २५ ते २७ दिवस चालणार असल्याची माहिती घोडचे शाखा अभियंता वैभव काळे यांनी दिली..Water Irrigation Relief: माढा आणि कर्जतच्या शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न विधानसभेत; सरकारचं आश्वासन.दरम्यान, कालव्याच्या आवर्तनासह घोड नदीपात्रातील पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. आमदार माउली कटके यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या दोन्ही प्रश्नांबाबत पाठपुरावा केला होता. कालव्यांचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, घोड नदीपात्रातही प्रशासनाने लवकर पाणी सोडावे, अशी मागणी गणेश साळुंके यांनी केली आहे..आठ हजार हेक्टरला फायदाया आवर्तनाचा शिरूर तालुक्यातील चिंचणी, मांडवगण फराटा, शिरसगाव काटा, पिंपळसुटी, कुरुळी, तांदळी, फराटेवाडी, वडगाव रासाई आणि इनामगाव आदी गावांतील सुमारे आठ हजार हेक्टर लाभक्षेत्राला फायदा होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.