Cotton Bollworm : प्रथिनांअभावी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव

Cotton Pest : शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले यांनी माहिती अधिकारातून कृषी विद्यापीठाकडून मिळविलेल्या माहितीतून हा खुलासा झाला आहे.
Cotton Bollworm
Cotton Bollworm Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : स्थानिक अजैविक ताणांमुळे कपाशीच्या झाडात प्रथिनांची निर्मिती कमी होते. त्यामुळे झाडाच्या प्रतिकारशक्‍तीवर परिणाम होत असल्याने गुलाबी बोंड अळीसह इतर किडींचा प्रादुर्भाव वाढतो आहे, असे निरीक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले यांनी माहिती अधिकारातून कृषी विद्यापीठाकडून मिळविलेल्या माहितीतून हा खुलासा झाला आहे. कृषी विद्यापीठाच्या संशोधन संचालनाकडून प्राप्त माहितीनुसार, अजैविक ताणांचा कापसावरील किडीवरही परिणाम होतो. शेतीमध्ये जास्त पाणी साचल्यामुळे व अधिक आर्द्रतेमुळे बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.

कापूस पीकवाढीच्या अवस्थेत असताना १२ ते ३० अंश सेल्सिअस तापमानामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढीस लागतो. उच्च तापमानात आणि मध्यम ते जास्त पाऊस असल्यास पांढऱ्या माशीच्या संख्येवर परिणाम दिसून येतो. कापूस पिकामध्ये जास्त पाणी साचल्याने जमिनीतील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते आणि विकास क्षीण होतो व किडींचा प्रादुर्भाव जास्त वाढतो.

Cotton Bollworm
Cotton Bollworm : कापूस पट्ट्यात गुलाबी बोंड अळीचे आक्रमण

बीटी प्रथिन निर्मितीत देखील अजैविक ताणामुळे समस्या निर्माण होतात. गॉसिपॉल हे कापसातील एक वैशिष्ट्यपूर्ण रसायन आहे. ज्यामध्ये बुरशीविरोधी व विषाणूविरोधी कार्यक्षमता आहे. गॉसिपॉल हे कापसाच्या मुळामध्ये तयार होते व नंतर ते वरील भागात पोहोचविले जाते. नंतर ते पेशींमध्ये साठविले जाते व झाडांचे कीड, रोगांपासून संरक्षण करते.

मात्र ‘हेवी मेटल स्ट्रेस’, अर्थात धातूच्या ताणामुळे कॅडमिअमचे वहन मुळापासून वरील भागापर्यंत होते. परंतु कॅडमिअमचे शोषण झाल्यामुळे गॉसिपॉलचे प्रमाण कमी होऊन गॉसिपोल संश्‍लेषण व त्याची वाहतूक क्षमता कमी होते. ताणामुळे बीटी प्रथिनांची पातळी कमी झाली आणि बोंड अळी नियंत्रित करण्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याचे निरीक्षणही अभ्यासाअंती नोंदविण्यात आले आहे.

Cotton Bollworm
Cotton Bollworm : ‘गुलाबी’ ग्रहण

कापसाच्या पानांच्या तुलनेत पात्यांमध्ये बीटी प्रथिनांचे प्रमाण तुलनेत कमी असल्यामुळे बोंड अळीचे प्राथमिक लक्ष्य पात्या ठरतात. त्याचा परिणाम उत्पादकतेवर होतो. मातीच्या क्षारतेमुळे रोपांच्या वाढीवर, पोषणावर परिणाम होतो. कापसाच्या पानांमध्ये बीटी प्रथिनांचे प्रमाण कमी होते असेही निरीक्षण आहे.

अजैविक ताण हे कापूस पिकातील बोंड अळी व इतर कीड, रोगांचे कारण ठरत आहे. बीटी प्रथिनांचे प्रमाण यामुळे कमी होत झाडात अपेक्षित प्रतिकारशक्‍ती राहत नाही. त्यामुळे किडी-रोग वाढतात. एक ते तीन आठवड्यांपर्यंत जमीन पानचिबड राहिल्यास पानांमधील बीटी प्रथिनांचे प्रमाण ३८ ते ते ५० टक्‍के कमी झाल्याचे निरीक्षण कृषी विद्यापीठाचे आहे. त्यामुळेच कापूस उत्पादक यवतमाळ जिल्ह्यात चिबड जमीन विकास कार्यक्रम राबविण्याची गरज आहे.
- मिलिंद दामले, प्रमुख, शेतकरी संघटना, तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com