Orange Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Orchard : संत्रा पट्ट्यात बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाची भीती

Team Agrowon

Amravati News : मोर्शी, वरुड, चांदूरबाजार व अचलपूर भागांत गारपीट, वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. आता वातावरण निवळले असले तरी संत्रा बागांत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तविली जात आहे.

लिंबूवर्गीय पीक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गारपिटीमुळे संत्र्याच्या आंबिया बहराच्या फळांची गळ झाली. त्यासोबतच लिंबाच्या हस्त बहरालाही फटका बसला. त्यामुळे संत्रा, मोसंबी आणि लिंबू या तीनही पिकांत बहरा संदर्भाने व्यवस्थापन करणे गरजेचे ठरणार आहे. अन्यथा या पिकांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.

यामध्ये फायटोप्थोरा, कोलेट्रोटिकम, डिप्लोडिया, अल्टरनारिया आदी बुरशींचा समावेश आहे. गारांचा मारा बसत खरचटलेल्या सालीमधून या बुरशी शिरकाव करतात. त्यासोबतच पानांना मार लागल्याने ती फाटतात तर मोठ्या प्रमाणात पानांची देखील गळ होते. यामुळे सूर्यप्रकाशात अन्न बनविण्याची प्रक्रिया मंदावते.

त्याचा परिणाम लहान फळांच्या गळतीवर होतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले. विद्यापीठांतील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रासायनिक उपाययोजना कराव्यात. झाडे उन्मळून पडली असल्यास किंवा झाडाची मुळे उघडी असल्यास मातीचा भर देऊन काडीच्या साहाय्याने आधार देत उभे करणे महत्त्वाचे आहे, असे अकोला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे फळ शास्त्रज्ञ डॉ. दिनेश पैठणकर यांनी सांगितले.

गारपीट व अवकाळी पावसामुळे संत्रापट्ट्यात सर्वाधिक ४३ हजार हेक्‍टरवरील नुकसानीचा अंदाज प्राथमिक सर्वेक्षणात वर्तविण्यात आला आहे. त्याची दखल घेत शासनाने भरपाई द्यावी, अशी माणगी जोर धरत आहे.

गारांचा मारा बसलेल्या फळांवर जखमा झाल्याने अशा फळांची रिकवरी शक्य होत नाही. त्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मात्र झाडांच्या फांद्या आणि झाडांची रिकवरी शक्य आहे.
डॉ. दिनेश पैठणकर, - फळ शास्त्रज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT