Nanded News : नांदेड जिल्ह्यात यंदाच्या हंगामात गुरुवारपर्यंत (ता. ९) सरासरी ११६३.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या १३९.०६ टक्के इतका आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ०.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात १४७२.४० मिमी नोंदविण्यात आला. हा वार्षिक सरासरीच्या १५१.२३ टक्के इतका आहे. .नांदेड जिल्ह्यात यंदा पावसाने भरभरून दिले आहे. मागील अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाने दमदार हजेरी लावत रेकॉर्डब्रेक हजेरी लावली. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ८९१.३० मिलिमीटर आहे. परंतु यंदा पावसाळ्याचा एक महिना शिल्लक असताना पावसाने वार्षिक सरासरी ओलाढंली आहे. .Tamhini Rainfall: ताम्हिणीत भारतातील सर्वाधिक पावसाची नोंद.हा पाऊस तब्बल अकरा तालुक्यात एक हजार मिलिमीटरपेक्षा अधिक झाला. या पावसामुळे खरिपातील साडेसहा हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. याबाबत शासनाकडून भरपाई देण्याचे काम सुरू आहे. या पावसामुळे रब्बीतील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे..दरम्यान, यंदा आजपर्यंत कंधार तालुक्यात १२३७.६० मिलिमीटर (१५६.५९ टक्के), लोहा १२७३.३० मिलिमीटर (१६०.२५ टक्के), आणि उमरी १३०९.६० मिलिमीटर (१५४.५९ टक्के) इतका पाऊस झाला आहे. दुसरीकडे देगूर (९१८.५० मिलिमीटर - १२१.६९ टक्के), भोकर (९५९.१० मिलिमीटर - १२२.१९ टक्के), आणि हदगाव (११६७.५० मिलिमीटर - १३२.५८ टक्के) या तालुक्यांत तुलनेने कमी पाऊस झाला आहे. नायगाव तालुक्यात १०४२.०० मिलिमीटर (१५१.९० टक्के) इतका पाऊस नोंदविला गेला आहे..Sangli Rainfall : सांगलीत सप्टेंबरमध्ये १४६ टक्के पाऊस.यंदा सरासरी वाढली...जिल्ह्याचा एकूण वार्षिक सरासरी पाऊस ८९१.३० मिलिमीटर असताना यावर्षी पावसाची मात्रा ११६३.१० मिमीपर्यंत पोहोचली आहे. मागील वर्षी याच दिवशी ८८२.०० मिमी पावसाची नोंद होती, म्हणजेच या वर्षी सरासरीपेक्षा १०५.४१ टक्के अधिक पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुके ‘सरासरीपेक्षा जास्त पाऊस’ या गटात आले आहेत. आगामी काही दिवस पावसाची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या कामांकडे लक्ष देण्याची गरज आहे..जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी (टक्क्यांत)नांदेड ११९४.४० मिमी (१५२.३१)बिलोली १०२७.५० मिमी (१२१.१५)मुखेड १०३७.४० मिमी (१३३.२५)कंधार १२३७.६० मिमी (१५६.५९)लोहा १२७३.३० मिमी (१६०.२५)हदगाव ११६७.५० मिमी (१३२.५८)भोकर ९५९.१० मिमी (१२२.१९)देगूर ९१८.५० मिमी (१२१.६९)किनवट १४७२.४० मिमी (१५१.२३)धर्माबाद ९६४.६० मिमी (१२०.३४)हिमायतनगर १२५३.५० मिमी (१४४.५५)माहूर १२९८.९० मिमी (१२७.७६)उमरी १३०९.६० मिमी (१५४.५९)अर्धापूर ११३३.६० मिमी (१५०.०५)नायगाव १०४२.०० मिमी (१५१.९०).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.