Raihgad News : जिल्ह्यामध्ये भातकापणीची लगबग सुरू झाली असून, शेतकरी मजुरांची जमवाजमव, अवजारांची तयारी करू लागले आहेत. यंदा परतीच्या पावसाने येथील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झालेले असून, भाताच्या लोंबी चिखलात पडलेल्या आहेत. त्या जमा करण्यासाठी जादा मनुष्यबळाची गरज भासणार आहे. अशात, जिल्ह्यात मजुरांची टंचाई भासत आहे. .रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. यावर्षी जिल्ह्यात सुमारे ९७ ते ९८ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. चांगल्या पावसामुळे भाताचे पीकही जोमदार आले. त्यामुळे शेतकरी आनंदी होते, मात्र ऐन कापणीच्या वेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. तरीही, आता पाऊस थांबल्यामुळे कापणीच्या हालचालींना वेग आला आहे..Paddy Crop Damage: हळव्या भाताचे अतोनात नुकसान.पावसाचे प्रमाण कमी होऊन सकाळच्या दरम्यान धुके पसरू लागले आहे. हे वातावरण भातकापणीला ठकत असल्याचे संकेत मिळत आहेत. भातकापणी वेळेवर झाल्यानंतर तांदूळ अखंड निघतो व त्याचा उतारा चांगला मिळतो. म्हणून पीक कापण्यासाठी येथील शेतकरी मनुष्यबळाची जमवाजमव करू लागला आहे..Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पुन्हा जोरदार पाऊस; भातपीक कापणी रखडली.भातकापणीसाठी येथे पारंपरिक अवजारे वापरण्याची पद्धत आहे. लहान आणि वजनाने हलकी विळे, खराळे, कोयत्या पाजवणे आणि त्यांना लाकडाच्या मुठी घालण्यासाठी सुताराच्या कार्यशाळेत गर्दी होतना दिसत आहे. भातकापणीला जास्तीत जास्त लोकांचा हातभार लागावा यासाठी घरातील सर्व अवजारे तयार ठेवली जातात..भात पेरणी, लावणी पुढेमागे झाली तरी चालते, परंतु कापणी मात्र वेळेत होणे गरजेचे असते. चार-पाच महिने केलेली मेहनत एका दिवसाच्या विलंबाने वाया जाण्याची शक्यता असते. मजूर मिळाले नाहीत तरी सकाळी पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत कंबर वाकवून कापणी करावी लागते. चिखल आणि वरून जाणवणाऱ्या ऑक्टोबर हिटमध्ये काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे कापणी आणि त्यानंतर मळणीला उशीर होतो. यासाठी आधीपासूनच तयारी करून ठेवावी लागते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.