Accident Sugarcane Workers agrowon
ॲग्रो विशेष

Accident Sugarcane Workers : ऊस तोडणी कामगारांचा भीषण अपघात, चारजण दगावले

Accident Sugarcane Workers : घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबलेल्या कामगारांवर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत ऊसतोडणी मजुरांसह चौघांचा मृत्यू झाला.

sandeep Shirguppe

Sugarcane Cutting Workers : राज्यातील गळीत हंगाम संपुष्ठात आल्याने अनेक साखर कारखान्यांचे ऊस तोड कामगार परतीच्या मार्गावर आहेत. दरम्यान सांगली जिल्ह्यातून ऊसतोड कामगार गावाकडे जात असताना एक दुर्देवी घटना घडली आहे. घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबलेल्या कामगारांवर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत ऊसतोडणी मजुरांसह चौघांचा मृत्यू झाला.

यामध्ये तब्बल १० जण गंभीर जखमी झाले आहेत मृतातील तिघे चिखलगीचे तर एक जण शिरनांदगीचा असल्याची माहिती समोर आली आहे. सदरची घटना नागपूर -रत्नागिरी महामार्गावर नागज फाट्याजवळ मध्यरात्री दोनच्या दरम्यान घडली.

या घटनेतील सविस्तर माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचे साधन नसल्याने ऊसतोडीसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात अनेक कामगार येत असतात. यातील काही ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते.

यंदाचा गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना मध्यरात्री रात्री दोन वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा केला. यावेळी पाठीमागून आलेल्या आंध्रप्रदेशातील ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

यामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर (वय ३०) रा.शिरनांदगी,जगमा तम्मा हेगडे (वय ३५), दादा आप्पा ऐवळे (वय १७), निलाबाई परशुराम ऐवळे (वय ३) रा.चिक्कलगी यांचा जागीच मृत्यू झाला. तर १० जण गंभीर जखमी आहेत जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ व मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले.

चिक्कलगी व शिरनांदगीत शोककळा

या अपघाताची वृत्त समजतात चिक्कलगी व किंवा शिरनांदगी या गावावर शोककळा पसरली असून मयत मजूर व त्यांचे नातेवाईक हे परिस्थितीने गरीब असल्यामुळे त्यांना उपचारासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन पाटील व गुलाब थोरबोले यांनी पहाटेची घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT