Nursery News Agrowon
ॲग्रो विशेष

Nursery News : सिंधुदुर्गात रोपवाटिका केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली

Sindhudurg Rain update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी (ता.१३) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता. बुधवारी (ता. १४) पहाटेच्या सुमारास जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी (ता.१३) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता. बुधवारी (ता. १४) पहाटेच्या सुमारास जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका तयार करण्याच्या कामाला गती दिली.

मात्र बुधवारी (ता. १४) सकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला. गुरुवारी (ता. १५) सकाळपासून पाऊसच पडला नव्हता. त्यामुळे रोपवाटिका तयार केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

रात्री हलक्या सरी तर दिवसभर कडक ऊन अशीच काहीशी स्थिती सध्या जिल्ह्यात आहे. गुरुवारी (ता. १५) सकाळपासून जिल्ह्यात पाऊस पडला नव्हता. जिल्ह्यात ११ जूनला मॉन्सूनचे आगमन झाले. त्यानंतर दोन दिवस सर्वत्र पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

परंतु दमदार पावसाअबावी शेतीची कामे रेंगाळली होती. मंगळवारी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकरी सुखावला. रेंगाळलेली भात रोपवाटिकांची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली. बुधवारी (ता. १४) सकाळपासून बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली.

परंतु सकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला. बुधवारी अधुनमधून हलक्या सरी पडत होत्या. रात्री पावसाने दडी मारली.

१० ते १२ दिवस उशिराने शेतीची कामे

या वर्षी मॉन्सूनपूर्व पाऊस पडला नाही आणि मॉन्सून लांबला. त्यामुळे दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी शेतीची कामे यावर्षी १४ जूनपासून सुरू झाली आहेत. बुधवारपासून भात रोपवाटिका तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुनर्लागवडदेखील लांबणीवर पडेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Damage: गारपीट अवकाळीचा पिकांना तडाखा; विदर्भ, मराठवाड्यात पिकांचे नुकसान; बळीराजा संकटात

Panchayat Raj Abhiyan: पंचायतराज समृद्ध अभियानात सोलापुरातील २५० गावांचा सहभाग

Farmers Demands: ‘आधी गळती काढा, मगच पाणी सोडा’

Nira Canal Water Release: नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तनाला सुरुवात

Agrowon Podcast: सोयाबीनचा भाव टिकून; कापुस दरात सुधारणा, कैरीला उठाव, कलिंगडाला मागणी तर तुरीचे दर स्थिरावले

SCROLL FOR NEXT