Nashik News : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात बंदी असूनही अवैधरीत्या ‘एचटीबीटी’ कापूस बियाण्यांची उपलब्धता करून लागवड केली जाते. या बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत व उगवणक्षमतेबद्दल कोणतीही उत्पादक किंवा विक्रेते जबाबदारी घेत नाही. खरेदीचे पक्के बिल नसल्याने शेतकरी तक्रार करू शकत नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांनी संभाव्य फसवणूक व नुकसान टाळण्यासाठी अवैध एसटीबीटी बियाणे खरेदी टाळावी. या पार्श्वभूमीवर या बियाणे विक्री–पुरवठ्यावर गुणनियंत्रण विभागाची नजर आहे. वैध एचटीबीटी कापूस वाणाला कोणी चोर बीटी, राऊंडअप बीटी कुणी आरआरबीटी म्हणतात.
ग्लायफोसेट या तणनाशकाला प्रतिकार करणारे घटक यात असल्याचे सांगितले जाते. मात्र, बाबतचा कुठलाही अभ्यासपूर्ण संशोधन अहवाल अधिकृतरीत्या प्रसिद्ध झालेला दिसून येत नाही. तसेच लागवडीसाठी शिफारस नाही.त्यामुळे उत्पादन व उत्पन्नवाढीचा हा दावा दिशाभूल करणारा आहे, असे कृषी विभागाने कळविले आहे.
बियाणे विक्री म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक
केंद्र सरकारच्या जीईसी समितीची या बियाण्यास मान्यता नाही. तसेच विद्यापीठांची शिफारस नाही.त्यामुळे अवैध विक्रेते एचटीबीटी बियाण्यांची खरेदी-विक्री बिगर बिलाने करतात. यासह लागवड पश्चात उगवणक्षमता,बोंड न लागणे, उत्पादन कमी येणे अशा अडचणी आल्यास खरेदी बिले नसल्याने कृषी विभागाकडे तक्रार करता येणार नाही. याशिवाय ग्राहक मंचात तक्रार स्वीकारली जात नाही.पुढे नुकसान भरपाई मिळणार नाही,याची काळजी घ्यावी,असे आवाहन गुणनियंत्रण विभागाने केले आहे.
मागील वर्षी ४७ लाखांचे बियाणे जप्त
अवैध एचटीबीटी कापूस बियाणे विक्री रोखण्यासाठी गुणनियंत्रण विभाग सावध आहे. गेल्या वर्षी एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करणाऱ्यांवर ७ पोलिस गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये ३,१३९ बियाण्याचे पाकिटे जप्त झाले,त्यांची किंमत ४७ लाख होती.
बियाण्याची गुणवत्ता असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी हे बियाणे वापरू नये. शिफारस केलेली बियाणे वापरावे. बियाणे खरेदीवेळी पिके बिल घ्यावे.–सुभाष काटकर, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग
कापूस उत्पादक शेतकरी भारतात बंदी असलेले एसटीबीटी बियाणे खरेदी करून बियाणे उत्पादक कंपन्यांच्या भूलथापांना बळी पडतात. मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी राऊंडअप बीटी, आरआरबीटी f२आणि f३ जनरेशनचे बियाणे विक्रीसाठी येणार असल्याचे वृत्त आहे.नुकसान टाळण्यासाठी असे नित्कृष्ट दर्जाचे बियाणे खरेदी करू नये.–उल्हास ठाकूर, तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण), नाशिक कृषी विभाग
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.