Farmer Agitation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Compensation : पिकविमा भरपाईसाठी शेतकऱ्यांचे पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

Farmer Protest : २०२३-२४ खरिप आणि रब्बी हंगामातील पिक विमा न मिळाल्याने, डोणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील ४७५ शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी अर्जासह पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या दिला आंदोलन करण्यात आले.

Roshan Talape

Dongaon News : २०२३-२४ खरिप आणि रब्बी हंगामातील पिक विमा न मिळाल्याने, डोणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील ४७५ शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी अर्जासह पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या दिला आंदोलन करण्यात आले. डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

या आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलनाचे ठिकाण सोडणार नाहीत अशी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर डोणगाव पोलिस अधिकारी अमरनाथ नागरे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.

नागरे यांनी तक्रारींचा स्वीकार करण्याची प्रक्रिया स्पष्ट केल्यानंतर सांगितले की, तक्रार सादर केल्यानंतर संबंधित विभागाला कायदेशीर कारवाईसाठी पाठवली जाईल. यासोबतच, वरिष्ठांना देखील याबाबत लेखी पत्र दिले जाणार आहे. शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारून कायदेशीर कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकरी शांत झाले.

राज्य सरकारने त्यांचा हिस्सा पिकविमा कंपनीकडे जमा करावा जेणेकरून तातडीने पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल अशी शेतकऱ्यांची मागणी होती. या आंदोलनावेळी ऋषांक चव्हाण म्हणाले की, ही लढाई एवढ्यावरच थांबणार नसून पिक विमा न मिळाल्यास शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन न्यायालयात याचिका दाखल करू शेतकऱ्यांना एक रुपयाही खर्च लागणार नाही.

यावेळी देवेंन्द्र आखाडे,अरविंद दांदडे,गणेश धाबे,अनिल लांडगे,अविनाश टाले, नारायण कऱ्हाळे,शरद देशमुख,शंकरराव टाले, सलीम शहा,जावेद खाँसाब,मोहन चव्हाण,अदिनाथ लोकडे, गजानन टोन्चर,प्रभाकर शिंदे,रामेश्वर वायाळ,दिलीप टाले,राजू पळसकर,तेजराव देशमुख, उमेश वैद्य, रणजीतराव देशमुख, प्रभाकर शिंदे,रामेश्वर वायाळ,दिलीप टाले,राजू पळसकर,शेकडो शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

राज्य सरकारने आपला हिस्सा विमा कंपनीकडे जमा करावा, जेणेकरून तातडीने विमा मिळू शकेल. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
डाॅ. ऋतुजा चव्हाण
तब्बल दहा महिने झाल्यामुळे 12% व्याजासहित पिक विमा रक्कम मिळाली पाहिजे असा कायदा आहे.तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी शिफारस केल्याप्रमाणे नियमाने 18% व्याजदराने रक्कम मिळायला पाहिजे अन्यथा पीक विम्याचे कार्यालय ठिकाणावर ठेवणार नाही.
डॉ. ज्ञानेश्वर टाले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT