Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ८१४ कोटी रुपयांची पिकविमा भरपाई; आंबिया बहार २०२३-२४ मधील नुकसानग्रस्तांना दिलासा

Compensation for Damages : आंबिया बहार २०२३-२४ मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे. राज्यातील १ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८१४ कोटी रुपये जमा होणार आहेत.
Crop Insurance Compensation
Crop Insurance CompensationAgrowon
Published on
Updated on

Pune News : आंबिया बहार २०२३-२४ मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे. राज्यातील १ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८१४ कोटी रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती पुणे कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली.

आंबिया बहार २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांना हवामान आधारित फळ पिक विमा योजनेद्वारे ही नुकसान भरपाई तीन विमा कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये भारतीय कृषी विमा, रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि एच.डी.एफ.सी. इर्गो या कंपन्यांचा समावेश आहे.

कमी-जास्त पाऊस, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, अवेळी पाऊस, आणि गारपीट या हवामान धोक्यांमुळे फळ पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो. ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण म्हणून राज्यात फळपिक विमा योजना राबवली जात आहे.

आंबिया बहारमध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, आणि पपई या ९ फळपिकांसाठी महसूल मंडल स्तरावर ही योजना राबविण्यात येते. नुकसान भरपाईची रक्कम हवामान केंद्राच्या नोंदीनुसार निश्चित केली जाते.

Crop Insurance Compensation
Fruit Crop Insurance : फळ पीकविमा परताव्यापोटी शासनाकडून निधीचे वितरण

विमा हप्ता व नुकसान भरपाई

यात ३५ टक्क्यांपर्यंत एकूण विमा हप्ता असल्यास शेतकरी विमा संरक्षित रकमेच्या साधारण ५ टक्के व उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार अनुदान म्हणून भरत असते. तर ३५ टक्के पुढील विमा हप्ता असेल तर वाढीव विमा हप्त्यात शेतकऱ्यांचा वाढीव वाटा ५० टक्के असतो.

आंबिया बहार २०२३-२४ साठी राज्य शासनाने एकूण ३९० कोटी रुपयांचा विमा हप्ता निश्चित केला होता. त्यापैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान म्हणून ३४४ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. हे अनुदान विमा कंपन्यांना दिल्यानंतर केंद्र सरकारचे दुसरे अनुदान देखील विमा कंपन्यांना प्राप्त होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई विमा कंपनीमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Crop Insurance Compensation
Fruit Crop Insurance : आंबा, काजूचा ७८ कोटी विमा मंजूर

विमा कंपनी निहाय सविस्तर माहिती

- भारतीय कृषी विमा कंपनी ६० हजार ६०६ शेतकऱ्यांच्या खात्यात ३६१ कोटी ९९ लाख रुपये जमा करणार आहे.

- रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीमार्फत ८५ हजार १६३ शेतकऱ्यांना २१६ कोटी ६५ लाख रुपये मिळणार आहेत.

- एच.डी.एफ.सी. इर्गेा कंपनी ५० हजार ६१८ शेतकऱ्यांच्या खात्यात २३५ कोटी ५९ लाख रुपये वितरित करणार आहे.

केंद्राकडून अनुदानाचा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर आंबिया बहार २०२३-२४ हंगामासाठी आत्तापर्यंत निश्चित करण्यात आलेली ८१४ कोटी रुपयांची नुकसान भरपाई विमा कंपन्यांमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यामुळे हवामानाच्या धोक्यांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
विनयकुमार आवटे, कृषी संचालक, कृषी आयुक्तालय, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com