Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Update : शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी पैसे देऊ नये

Agriculture Department : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कुठल्याही व्यक्तीला पंचनामा करण्यासाठी पैसे देऊ नयेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Team Agrowon

Washim News : वाशिम जिल्‍ह्यात मागील कालावधीत अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्वसूचना प्राप्त झाल्या आहेत. या पूर्वसूचनांचे स्थानिक परिस्थितीनुसार यादृच्छिक पंचनामा व वैयक्तिक पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू आहे.

मात्र वैयक्तिक पंचनामा करताना काही ठिकाणी विमा कंपनीने नेमलेले पर्यवेक्षक हे शेतकऱ्यांना पैशांची मागणी करत असल्याच्या घटना घडत आहेत. तसेच काही ठिकाणी अज्ञात/अनधिकृत व्यक्ती कंपनी प्रतिनिधी म्हणून पंचनामा करण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याचे प्रकार घडले आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कुठल्याही व्यक्तीला पंचनामा करण्यासाठी पैसे देऊ नयेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना या खरीप हंगामात राबवली जात आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

त्यानुसार वाशीम जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे.

योजनेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाले असल्यास व विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हेनंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत भारतीय कृषी विमा कंपनीस पूर्वसूचना कळविली असल्यास वैयक्तिक पंचनामा विमा कंपनीने नियुक्त केलेले पर्यवेक्षक, कृषी विभागाचे प्रतिनिधी तसेच शेतकरी यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण करणे बंधनकारक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT