Agriculture Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Agriculture Exhibition 2024 : ज्ञानाची शिदोरी गाठीशी बांधत शेतकरी परतले

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : आधुनिक शेतीपद्धतीतील सौरचलित उपकरणे, ड्रोन, मजूरटंचाईवर उपाय सांगणारी नावीन्यपूर्ण अवजारे, बी-बियाणे, खतांपासून ते शेतीतल्या विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाने छत्रपती संभाजीनगरमध्ये भरलेल्या ‘अॅग्रोवन’च्या चारदिवसीय कृषी प्रदर्शनाची रविवारी (ता. १४) यशस्वी सांगता झाली. प्रदर्शनामध्ये सहभागी शेतकऱ्याला प्रवेशिकांमधून ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने ट्रॅक्टर जिंकण्याची संधी देण्यात आली.

त्यात छत्रपती संभाजीनगरमधील बजरंगनगरच्या समर्थ संजय चरक हा शालेय विद्यार्थी ‘लकी ड्रॉ’द्वारे ट्रॅक्टर जिंकणारा भाग्यवंत ठरला. मराठवाड्यासह, खानदेश, विदर्भ, वऱ्हाड, पश्‍चिम महाराष्ट्र अशा राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकऱ्यांनी प्रदर्शनात हजेरी लावली आणि इथे पाहिलेली, अनुभवलेली ज्ञानाची शिदोरी गाठीशी बांधत नव्या उमेदीने ते गावाकडे परतले.

जालना रोडवरील श्रीराम मंदिर ट्रस्ट मैदानावर हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक जी. के. एनर्जी सोलरपंप हे होते, त्याशिवाय इकोजेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स बी. जी. चितळे डेअरी (भिलवडी, सांगली), इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को),

तसेच कृषी विभाग महाराष्ट्र राज्य व आत्मा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन साकारले. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यासह विविध कंपन्या, शासकीय व निमशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, बॅंका व उद्योग संस्थांनी समाधान व्यक्त केले.

गेल्या चार दिवसांत ज्येष्ठ शेतकरी, महिला, तरुण आणि शेतीतले तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही कृषी प्रदर्शनासाठी अलोट गर्दी केली. अनेक शेतकऱ्यांनी प्रदर्शनात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती घेतलीच, पण कीड-रोगांवरील उपाय, शेतीपूरक आणि प्रक्रिया उद्योगासह यांत्रिकीकरणाची विविध दालने विशेष आकर्षण ठरली.

प्रदर्शनातील दालनांतून मिळालेल्या माहितीमुळे शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली. सौरचलित शेतीपंप, संरक्षित कुंपण आदी उपकरणे, इलेक्ट्रिक बूल, ड्रोन, उच्च तंत्रज्ञानावर आधारित कृषी उत्पादने तसेच देशी विदेशी अवजारे व यंत्रांच्या स्टॉल्सवर सर्वाधिक तरुण शेतकरी रेंगाळले होते.

समर्थ चरक ठरला ट्रॅक्टर विजेता

कृषी प्रदर्शनाच्या चारही दिवशी शेतकऱ्यांच्या प्रवेशिका नोंदणीस मोठा प्रतिसाद मिळाला. या शेतकऱ्यांमधून एका शेतकऱ्यास ‘लकी ड्रॉ’ काढून ट्रॅक्टर जिंकण्याची संधी देण्यात आली. त्यानुसार या प्रवेशिकेमधून छत्रपती संभाजीनगरचे अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या हस्ते ट्रॅक्टरसाठी रविवारी (ता. १४) ‘लकी ड्रॉ’ काढण्यात आला. त्यात नववीत शिकणारा समर्थ संजय चरक (रा. बजरंगनगर, छत्रपती संभाजीनगर) हा विद्यार्थी ट्रॅक्टरचा विजेता ठरला.

समर्थचे मूळगाव महाळंगी (ता. चाकूर, जि. लातूर) हे आहे. चरक कुटुंबीयांची गावात ३० एकर शेती आहे. समर्थचे वडील संजय हे मुलांच्या शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाले आहेत.

ते खासगी नोकरी करतात, तर समर्थचे चुलते सतीश चरक शेती करतात. आजवर भाडेतत्त्वावर ट्रॅक्टरने शेतीकामे करणारे चरक कुटुंबीयांना ट्रॅक्टर जिंकल्यानंतर आनंद व्यक्त केला आणि यापुढे शेतीकामे सुलभ होतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ‘अॅग्रोवन’चे उपसरव्यवस्थापक बाळासाहेब खवले आणि श्री. लांजेवार यांच्या हस्ते समर्थसह वडील संजय, आई संगीता, छोटाभाऊ स्वराज आदी कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT