Agriculture Exhibition 2024 : सेंद्रिय कापूस पिकवला; प्रक्रियेतून दिली बाजारपेठ

Agriculture Exhibition : सोबलगाव येथील उंच भरारी महिला गटातील महिला सदस्यांनी ॲग्रोवन कृषी प्रदर्शनस्थळी प्रवेशिका भरून दिल्या.
Agriculture Exhibition
Agriculture Exhibition Agrowon
Published on
Updated on

Agri Expo 2024 : पारंपारिक पिकांना बाजारभाव आणि बाजारपेठ मिळत नाही. हे सध्या शेतीसमोरील मोठे आव्हान आहे, पण आम्ही यावर सामूहिक शेतीच्या माध्यमातून पर्याय शोधला. सेंद्रिय कापसाचे उत्पादन घेतले.

आता त्याचे मूल्यवर्धन करीत त्यापासून गाठी तयार करण्यावर भर दिला आहे. सोबलगाव (ता.खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील उंच भरारी महिला बचत गटातील सदस्यांनी आपल्या प्रयत्नांची कहाणी आत्मविश्वासाने सांगितली. आमच्या यशात ॲग्रोवनचा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Agriculture Exhibition
Agrowon Agriculture Exhibition 2024 : नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाकडे युवा शेतकऱ्यांचा ओढा

या गटातील महिलांनी शनिवारी (ता.१३) ॲग्रोवन कृषी प्रदर्शनाला भेट देत विविध स्टॅाल्सवर आपल्या व्यवसायाच्या अनुषंगाने माहिती जाणून घेतली. गटातील सरला शिंदे आणि अनिता बनसोड म्हणाल्या की खुलताबाद हा पारंपरिक पिकांसाठी प्रसिद्ध तालुका आहे.

शेतमालाचे दर असमाधानकारक आहेत. उत्पादन खर्चाची भरपाई देखील शक्‍य होत नसल्याने कापूस, सोयाबीन, तूर सारखी पिके घेणारे शेतकरी निराश आहेत. अशावेळी शेतमाल मूल्यवर्धनाकडे वळण्याचा आम्ही निर्णय घेतला.

Agriculture Exhibition
Agrowon Agriculture Exhibition 2024 : सौरऊर्जा उपकरणे, ड्रोन तंत्रज्ञानाने वेधले लक्ष

स्मार्ट प्रकल्पातून कापसाचे मूल्यवर्धन होत असल्याविषयी ॲग्रोवनमधून समजले होते. त्याआधारे कृषी विभागाच्या संपर्कात राहात आम्हीही कापसावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सेंद्रिय कापूस असल्यास त्याला वाढीव दर मिळतो असे समजल्यानंतर त्या उत्पादनासाठी पुढाकार घेतला.

पंधरा एकरांवर अशाप्रकारचा कापूस पिकविण्यात आला. पुण्यातील प्रयोगशाळेकडे त्याचे नमुने पाठवून त्याचा अहवाल अपेक्षित आल्याने आमचा हुरुप वाढला आहे. आता लवकरच जिनिंग मिल्सना कापसाचा पुरवठा करून गाठी तयार करण्यात येतील. त्यापुढील टप्प्यात गाठींची विक्री महाकॉट ब्रॅण्डने होणार आहे अशी माहिती या गटातील महिलांनी दिली.

उंच भरारी समूहातील महिला सदस्यांमध्ये सरला शिंदे, अनिता बनसोड, वैशाली बनसोड, नंदा आघाडे, तारा बनसोड, गंगासागर साळुंखे, जयश्री आघाडे,अनिता आघाडे, मीरा मालोदे, अलका गायकवाड, वर्षा मालोदे, रंजना सुरोशे, संगीता बोरसे यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com