Agrowon Agriculture Exhibition 2024 : सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाकडे कल

Agriculture Exhibition : -ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनात शनिवारी (ता.१३) सलग तिसऱ्या दिवशीही राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आले होते. प्रदर्शनातील विविध स्टॅाल्सवर फिरून शेतकरी माहिती घेत होते.
Agriculture Exhibition
Agriculture ExhibitionAgrowon
Published on
Updated on

Agri Expo 2024 : सकाळ-ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनात शनिवारी (ता.१३) सलग तिसऱ्या दिवशीही राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आले होते. प्रदर्शनातील विविध स्टॅाल्सवर फिरून शेतकरी माहिती घेत होते. कृषी निविष्ठा, बी-बियाणे, सिंचन सुविधेसह सेंद्रिय शेती ते हायटेक शेतीसंबंधीची माहिती खूपच फायदेशीर ठरल्याचे शेतकरी आवर्जून सांगत होते.

ॲग्रोवन आयोजित कृषी प्रदर्शनात विविध पिकांच्या उत्पादनासह इतर बाबींची माहिती उपलब्ध आहे. त्यातून शेती व्यवस्थापन कसे करावे, वाणांची निवड, सूक्ष्म सिंचन आदी माहिती मिळाली. शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असे उपक्रमही येथे आहेत.

- श्रीकृष्ण लोखंडे, गोपी, ता. जाफराबाद, जि.जालना

मी अडीच एकर शेतीमध्ये सोयाबीन, ज्वारी आदी पिके घेतो. त्यात इतर कोणती पिके घेता येतील, यासाठी प्रदर्शनातून माहिती मिळाली. शेतीला पूरक अवजारे, तंत्रज्ञान, बागायती पिकांची माहिती येथे आहे.

-भागाजी रिठे, चिकलठाणा, ता.जि. छत्रपती संभाजीनगर

शेती, मातीसंबंधी पुस्तके, तंत्रज्ञान, शेततळे, बचत गटांचे काम या प्रदर्शनातून अभ्यासता आले. चांगली माहिती मिळाली. ही माहिती अल्पभूधारक व इतर शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन करताना उपयुक्त अशी आहे.

- रवी गाजरे, जि. छत्रपती संभाजीनगर

पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विविध पिके कशी घेता येतील, याची माहिती प्रदर्शनातून मिळाली. प्रदर्शनातील दालनेही अभ्यासण्यासारखी आहेत.

-बबनराव गोरे, आरडा, ता. मंठा, जि. जालना

Agriculture Exhibition
Agrowon Agriculture Exhibition 2024 : नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाकडे युवा शेतकऱ्यांचा ओढा

नैसर्गिक व इतर समस्यांमुळे शेती नुकसानीत चालली आहे. अशात पीक पद्धती कशी हवी, काय बदल करायला हवेत, याची नेमकी माहिती या प्रदर्शनात मिळत आहे.

-भीमराज मारुती गवळी, निंभारी, ता. नेवासा, जि. नगर

प्रदर्शनात सौर ऊर्जा पंप, शेततळ्याचे अस्तरीकरण, पूरक उद्योग, पीक संरक्षणासाठीचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी माहिती मिळाली.

- सोपान मस्के, जोगवाडा, ता. जिंतूर, जि. परभणी

दिवसेंदिवस मजुरी खर्चात वाढ होत आहे, हा खर्च कमी करण्यासाठी कुटुंबातील सर्वजण शेती कामांमध्ये मदत करतात. प्रदर्शनामधील आधुनिक शेती अवजारे पाहून यांत्रिकीकरणावर भर दिल्यास मजुरांवरील अवलंबित्व कमी करणे शक्य असल्याचे लक्षात आले.

-पल्लवी ज्ञानेश हूड, पाडळी, जि. छत्रपती संभाजीनगर

आमचा भाग दुष्काळप्रवण आहे. दुष्काळी स्थितीत पीक कसे जगवावे, या विषयीची माहिती व्हावी, म्हणून प्रदर्शनाला भेट दिली. त्यातील ‘लढा दुष्काळाशी’ हे दालन प्रेरणादायी ठरले. दालनातील काही शेतकऱ्यांच्या जलसंधारण प्रयोगांचा अवलंब प्रत्यक्ष शेतीत करण्याचे ठरविले आहे.

- लिंबाजी पंढरी जपफळे, खोडवा सावरगाव, ता. परळी, जि. बीड

Agriculture Exhibition
Agrowon Agriculture Exhibition 2024 : ‘नवरदेव बीएस्सी ॲग्री’ अवतरला कृषी प्रदर्शनात

शेतीमध्ये नवनवे बदल घडत आहेत. त्या संदर्भातील शेतकऱ्यांचे प्रयोग रोज ॲग्रोवनमधून समजतात. हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष प्रदर्शनामध्ये अनुभवता आले. नव्या शेती अवजारांविषयी माहिती मिळाली. रेशीम शेती शाश्‍वत असल्यामुळे त्या संदर्भातील माहिती विशेष करून घेतली.

- नामदेव गंगाधर माथने, मोसा, ता. मंठा, जि. जालना

आमची दहा एकर शेती आहे. कुटुंबातील बहुतांश सदस्य शेती कामे करतात. मजुरांची समस्या वाढत आहे. त्यासाठी प्रदर्शनात माहिती घेतली.

- वंदना बद्रीनाथ वाघ, जडगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर

शेतीतील यांत्रिकीकरण हा माझा आवडता विषय आहे. ड्रोनद्वारे फवारणीकरिता शासकीय अनुदान असलेल्या योजनांंविषयी प्रदर्शनात माहिती मिळाली.

- नारायण माथने, धामणगाव, ता. सेलू, परभणी

भारतीय सैन्यदलातून हवालदार पदावरून निवृत्त झाल्यापासून शेती करत आहे. यंदाच्या दुष्काळी स्थितीत नवीन ठिबक करायचे आहे. त्यासंबंधी प्रदर्शनात माहिती घेतली.

- भरत शेळके, शाहू टाकळी, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर

मिनी डाळ मिल, खत, पाणी व्यवस्थापनाचे नव तंत्रज्ञान, पशुआहार व्यवस्थापनासह शेतकऱ्यांचे श्रम कमी करणारी विविध अवजारे अशी नवीन माहिती प्रदर्शनातून मिळाली.

- द्वारकादास भंडारी, आष्टा, ता. चाकूर, जि. लातूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com