Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : शेतकरी आंदोलकांनी पुढची रणनीती आखली; ६ मार्चला दिल्लीकडे कूच तर १० मार्चला 'रेल्वे रोको' आंदोलन

Delhi Farmers Protest : ६ मार्च रोजी पंजाब आणि हरियाणा वगळता देशातील इतर राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करावी, असे आवाहन शेतकरी नेत्यांनी केलं आहे. तसेच १० मार्च रोजी देशभरात शेतकऱ्यांनी चार तास 'रेल रोको' आंदोलन करण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंजाबमधील शेतकरी हमीभाव कायद्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी दिल्ली चलो आंदोलन १३ फेब्रुवारीपासून पुकारलं आहे. शेतकरी आंदोलनाचा सोमवारी (ता. ०४) २१ वा दिवस आहे. पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवरील शंभू आणि खनौरीमध्ये २०० हून अधिक शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. मध्यंतरी शेतकरी आंदोलन स्थगित आले होते. मात्र आता आंदोलक शेतकऱ्यांनी ६ मार्चला दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. तर १०  मार्च रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत 'रेल्वे रोको' आंदोलन केले जाणार आहे. 

खनौरी सीमेवर पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये झडलेल्या वादात शेतकरी शुभकरन सिंह यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला होता. रविवारी (ता.३) भटिंडा जिल्ह्यातील बल्लो गावात मृत तरुण शेतकरी शुभकरन सिंह यांना श्रद्धांजली वाहिण्यात आली. या श्रद्धांजली कार्यक्रमानंतर पुन्हा दिल्ली आंदोलनाबाबात निर्णय घेतला जाईल, असेही घोषित केले होते. 

सरकारला गुडघे टेकायला लावू

६ मार्च रोजी पंजाब आणि हरियाणा वगळता देशातील इतर राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करावी, असे आवाहन शेतकरी नेत्यांनी केलं आहे. तसेच १० मार्च रोजी देशभरात शेतकऱ्यांनी चार तास 'रेल रोको' आंदोलन करण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. तर दिल्लीतील रामलीला मैदानावर १४ मार्चला शेतकरी नेत्यांनी किसान महापंचायत घेण्याचा निर्णय घेतला आहे. 'दिल्लीला जाण्याची आमची योजना पूर्वीसारखीच आहे. त्यात बदल होणार नाहीत. सरकारला गुडघे टेकण्यासाठी आम्ही रणनीती ठरवली आहे', असे शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी माध्यमांना सांगितले. तसेच शंभू आणि खनौरी हद्दीत शेतकऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार असून उर्वरित सीमा देखील बंद करण्यात येतील, असाही इशाराही डल्लेवाल यांनी दिला आहे.

पुढे डल्लेवाल म्हणाले की, 'शेतकरी ट्रॅक्टर सोडून दिल्लीला यावे, असे सरकार म्हणत आहे. आता ६ मार्चला देशभरातील शेतकरी ट्रेन, बस आणि पायी चालत शांततेने दिल्लीकडे कूच करतील. सरकार या शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलनास बसू देतात का, ते पाहावे लागेल.

मजूर किसान मोर्चाचे नेते श्रवण पंढेर

शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सीमेवर आंदोलन सुरूच राहणार', असल्याचे मजूर किसान मोर्चाचे नेते श्रवण पंढेर यांनी स्पष्ट केले. पंढेर पुढे म्हणाले, “आम्ही शेतकरी खनौरी आणि शंभू सीमेवर राहू, आम्ही आमच्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीशिवाय पुढे जाणार नाही. आम्ही दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढण्याचा आमचा निर्णय बदललेला नाही, जोपर्यंत सरकार पुन्हा हे रस्ते उघडत नाही, तोपर्यंत आम्ही प्रतीक्षा करू.

आम्ही इतर राज्यातील शेतकऱ्यांना ६ मार्च रोजी रेल्वे, बस किंवा इतर कोणत्याही वाहनाने दिल्लीकडे कूच करण्याचे आवाहन केले आहे." असंही पंढेर म्हणाले. तर यावेळी, केंद्र सरकारने या शेतकऱ्यांना वाटेतच रोखू नये, जंतरमंतरवर शांततेत आंदोलन करण्याची परवानगी द्यावी', अशी आशा पंढेर यांनी व्यक्त केली आहे. 

शेतकरी शुभकरन सिंहने जीव गमावला 

तरुण आंदोलक शेतकरी शुभकरन सिंह यांच्या मृत्यू प्रकरणी पंजाब पोलिसांनी पटणा, पटियाला येथे अज्ञाताविरुद्धात एफआयआर नोंदवला आहे. सोबतच सरकारने १ कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकास सरकारी नोकरी देण्याची घोषणा केल्याचा दावा पंजाब सरकारने केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT