Delhi Chalo Farmers Protest Update : आंदोलक शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. २४) आपले ‘दिल्ली चलो’ आंदोलन गुरुवारपर्यंत (ता. २९) स्थगित केल्याची घोषणा केली आहे. गुरुवारपर्यंत पंजाब-हरियाना सीमेवर थांबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलक ठिय्या कायम ठेवणार आहेत. आंदोलनाची पुढील दिशा गुरुवारी ठरविण्यात येईल, असे संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाने जाहीर केले आहे.
शेतकरी नेते श्रवणसिंग पंढेर यांनी आंदोलनासंबंधी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ शनिवारी (ता. २४) ‘कॅंन्डल मार्च’ काढला. तर आज (ता. २५) शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चासत्रे आयोजित केली जातील. उद्या (ता. २६) जागतिक व्यापार संघटनेच्या पुतळ्यांचे दहन करण्यात येईल. पुढील दोन दिवसांत दोन्ही शेतकरी संघटनांच्या बैठका होतील. खनौरी येथे झालेल्या संघर्षानंतर शेतकऱ्यांनी मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान ‘दिल्ली चलो’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाना सरकारने सात जिल्ह्यांतील इंटरनेट सेवांवरील बंदी शनिवारपर्यंत वाढविली होती. अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद आहे. पंजाबच्या मुख्य सचिवांनी हरियाना सरकारला पत्र लिहून हरियानातील रोहतक येथे उपचार घेत असलेल्या आंदोलकांना पंजाब सरकारकडे सुपूर्द करण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे संताप
खनौरी सीमेवर एका तरुण शेतकऱ्याच्या हत्येमुळे सर्व राज्यांतील जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे शनिवारी सर्वत्र काळा दिवस पाळण्यात आला आहे, असे संयुक्त किसान मोर्चाने एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.
‘‘केंद्रीय मंत्री अमित शहा, हरियानाचे मुख्यमंत्री एम. एल. खट्टर यांच्या पुतळ्याचे दहन देशाच्या विविध भागात करण्यात आले. खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅंडलमार्च काढले जात आहेत. सरकारचा ठिकठिकाणी निषेध केला जात आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
चर्चेसाठी मंत्र्यांची तीन सदस्यीय समिती
‘‘शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मंत्र्यांची तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती शेतकऱ्यांशी वाटाघाटी करत आहे,’’ अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली आहे. ‘‘शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. पंतप्रधान मोदी यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीही मोठे काम केले आहे,’’ असेही सीतारमन म्हणाल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.