Delhi Farmer Protest : शेतकरी आंदोलनात मृत शुभकरणच्या कुटुबिंयासाठी आप सरकारकडून एक कोटी जाहीर

Delhi Border Protest : पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे.
Delhi Farmer Protest
Delhi Farmer Protestagrowon

Punjab Haryana Farmers : मागच्या कित्येक दिवसांपासून पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनादरम्यान खनौरी सीमेवर मृत्यू झाला. याबाबत शुभकरण सिंगच्या मदतीला पंजाबचे आप सरकार धावून आलं आहे. शुभकरण यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. पंजाबच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने ही रक्कम देण्याची घोषणा केली आहे.

आज (ता.२३) मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोशल मीडियावर या निर्णयाची माहिती दिली आहे. याचबरोबर धाकट्या बहिणीलाही सरकारी नोकरी देणार असल्याचीही घोषणा केली.

भगवंत मान यांची पोस्ट व्हायरल, "खनौरी सीमेवर शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शुभकरण सिंग यांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून एक कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल आणि त्यांच्या लहान बहिणीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय झाला आहे. याचबरोबर दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. मी सध्या माझे कर्तव्य पार पाडत असल्याची माहिती मुख्यमंत्री मान यांनी दिली.

२०२०-२१ मध्ये शेतकरी आंदोलनात शुभकरण मोठ्या जोषात सहभाग झाला होता, यावेळी तो केवळ १८ वर्षांचा होता. दरम्यान पुन्हा दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर शुभकरण सिंग याचा मृत्यू गोळी लागल्याने झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे, मात्र त्याच्या डोक्यात कोणती गोळी लागली होती. त्याची माहिती शवविच्छेदन अहवालातूनच समोर आले आहे.

Delhi Farmer Protest
Chalo Delhi Farmers : दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ३० हजार अश्रूधुराच्या कांड्या, आंदोलनाला हिंसक वळण

दरम्यान, शेतकरी आणि सरकारमध्ये सुरू असलेल्या चर्चेवर कोणताही निर्णय झालेला नाही. शेतकरी नेत्यांनी पुन्हा दिल्लीकडे मोर्चा वळवण्याची घोषणा केली आहे. २३ फेब्रुवारीला देशभरात शेतकरी संघटना ब्लॅक फ्राय डे करत आहेत. सध्या सरकारने शेतकरी आंदोलकांना चर्चेच्या पाचव्या फेरीचा प्रस्ताव दिला आहे, मात्र अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

संयुक्त किसान मोर्चाने तर २६ फेब्रुवारीला देशभरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शुभकरण सिंग याच्या निधनानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. शुभकरण सिंग याच्या निधनावरून पंजाबमध्येही राजकारण तापलं आहे. अशातच आज पुन्हा एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com