Ratnagiri Nagpur Highway protest agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : नागपूर रत्नागिरी महामार्गावर रास्तारोको; आंदोलनावेळी पोलिसांकडून महिलांना धक्काबुक्की, राजू शेट्टींसह कार्यकर्त्यांची धरपकड

Former MP Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष, शेतकरी, महिला शेतकरी यांना सकाळपासून पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. तर पहाटेपासूनच अनेक कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला डांबून ठेवण्यात आलं आहे.

sandeep Shirguppe

Ratnagiri Nagpur Highway : महामार्ग बाधीत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा कोल्हापूर -सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष, शेतकरी, महिला शेतकरी यांना सकाळपासून पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. तर पहाटेपासूनच अनेक कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला डांबून ठेवण्यात आलं आहे.

सकाळी ९ च्या सुमारास राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी पोलिसांचा ताफा पोहोचला. त्यांना कडक बंदोबस्तामध्ये कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. कालपासून पोलीसांनी उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलिसांकडून बळाचा वापर केला जात आहे.

पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट

अंकली टोल नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने महिला आणि पुरूष कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. यावेली पोलिसांनी जोर जबरदस्तीने महिलांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध केला. आम्हाला हात लावाल तर आंदोलनाचा भडका उडेल असेही महिलांनी भूमिका घेतली यावर अंकली टोल नाक्यावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. आंदोलनस्थळी पोलिसा छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

आमरण उपोषणाचा पाचवा दिवस

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चोकाक ते उदगाव बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई आणि उदगाव बायपाससाठी कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील शिरोळ तालुक्यात जैनापुरात शेतकऱ्यांसह उपोषणाला बसले आहेत. मागच्या ५ दिवसांपासून विक्रम पाटील यांच्यासह बाधित शेतकरी उपोषण करत आहेत. बाधित शेतकऱ्याचा उपोषणाचा पाचवा दिवस असून तब्येत खालावली आहे. मात्र, प्रशासन दखल घेण्यास तयार नाही.

निर्णय होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार

राजू शेट्टी यांनी रत्नागिरी नागपूर महामार्गातील चोकाक ते अंकली या बाधित गावांमधील उदगाव व उमळवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मोजणी करणार आहेत. त्यामुळे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पळवून लावा. जे अधिकारी शेतामध्ये खुणा करतील त्या खुणा उपसून टाका. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. उपोषणकर्त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा थांबणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT