Soybean Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Farming : खेडमध्ये सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती

Team Agrowon

Chas News : खेड तालुक्यात खरीप हंगामातील पारंपरिक पिकांची जागा आता सोयाबीन पिकाने घेतली आहे. सरासरी ६,५२२ हेक्टर क्षेत्र असणाऱ्या सोयाबीन पिकाची यावर्षी तब्बल १८,९६०.२० हेक्टरवर पेरणी झाली आहे. शिवाय हे पीकही जोमदार आले आहे. मागील वर्षी सोयाबीन १७,१४९ हेक्टरवर पेरण्यात आले होते.

खरिपातील बाजरीचे क्षेत्र शून्य टक्क्यांवर, तर भुईमुगाचे क्षेत्र ४,३०३.०८ हेक्टर क्षेत्रावरून फक्त ६३४.९० हेक्टरवर आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी यांनी दिली आहे. तालुक्यात ४२१९९.०७ हेक्टर क्षेत्र हे एकूण खरीप हंगामाचे असून, यंदा ४४,८६७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

पारंपरिक पिकांना फाटा देत गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन पिकाला तालुक्यात पसंती वाढते आहे. चालू वर्षी पाऊस होईल या आशेवर जमिनीत पुरेशी ओल होताच खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील भाताच्या लागवडी करण्यासाठी भातरोपे तयार करण्यासाठी साळीची पेरणी केली होती.

तालुक्याच्या बहुतांश भागात हमखास उत्पन्न देणाऱ्या सोयाबीन पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली गेली. जमिनीत असणाऱ्या ओलीवर व अधूनमधून पडलेल्या पावसामुळे पिकांची उगवणही चांगली झाली व भात लागवडीही झाल्या तर सोयाबीन पिकाला पोषक पाऊस झाल्याने पिके उत्तम आहेत.

गेल्या काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप हंगामातील पारंपरिक असणाऱ्या भुईमूग, बाजरी, बटाटा, कडधान्य पिके यांच्याकडे शेतकरी दुर्लक्ष करत असून दिवसेंदिवस सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा जास्त ओढा दिसून येतो आहे. चालू वर्षी तर सरासरीच्या तब्बल २९०.७१ टक्क्यांवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

पीक सरासरी क्षेत्र हेक्टरी पेरणीचे क्षेत्र टक्केवारी

भात ७७५०.०२ ६८१५.३० ८७.९४

ज्वारी ३२.०८ ०० ००

बाजरी ६३१.०६ ०० ००

मका ३३०३ २९१५ ८८.२५

तूर १९३.०१ १५.४० १२.९०

मूग १९३.०१ ४९.०० २५.३८

उडीद १०९.०८ १२ १०.९३

भुईमूग ४३०३.०८ ६३४.९० १४.७५

सोयाबीन ६५२२ १८९६०.२० २९०.७१

कांदा ९ ०० ००

बटाटा ४५०० १३६७.०० ३०.३८

४२,१९९.०७ हेक्टर खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र

४४,८६७.०० हेक्टर यंदा सरासरी क्षेत्रावर झालेली पेरणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT