कोकणातील बहुतांश मंडलांत मागील वर्षभरापासून आपत्तिजनक स्थिती आहे. त्यामुळे या बाबतीत सर्व मंडलांतील नुकसानीची माहिती शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे विमा कंपन्यांनी संकलित करून अपेक्षित भरपाई वेळेत देणे गरजेचे होते. मात्र आंबा उत्पादकांना यासाठी मोठा पाठपुरावा करावा लागला.तीन वर्षांचा मोठा कालावधी संपल्यानंतर सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी पुनर्रचित हवामानावर आधारित आंबा फळ पीक विमा योजना पुन्हा सुरू करण्यात आली. रायगड जिल्ह्यासाठी युनिव्हर्सल सोम्पो इन्शुरन्स कंपनी लि., सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी, पालघर जिल्ह्यासाठी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि. यांना नेमून देण्यात आले आहे. यात जे ट्रिगर (प्रमाणके) समाविष्ट आहेत त्या माध्यमाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. .कारण या वर्षी शेतकऱ्यांना अनेक आपत्तींना सामोरे जावे लागले. दुर्दैवाची बाब म्हणजे या वेळी देखील रायगड बरोबरच पालघर जिल्ह्यांसाठी दुप्पट विमा हप्ता (प्रीमियम) आकारला आहे. समाविष्ट ट्रिगरनुसार अवेळी पाऊस १ डिसेंबर ते ३१ मार्च, १ एप्रिल ते १५ मे, कमी तापमान १ जानेवारी ते १० मार्च, वेगाचा वारा १६ एप्रिल ते १५ मे, जास्त तापमान मार्च ते १५ मे या कालावधीत कोकणातील बहुतांश मंडलांत आपत्तिजनक स्थिती होती..Fruit Crop Insurance: फळपीक विमा आंबा उत्पादकांसाठी अन्यायकारक .त्यामुळे या बाबतीत सर्व मंडलातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे विमा कंपनीकडून संकलित करणे अपेक्षित होते. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आली. त्याला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी युनिव्हर्सल सोम्पो इन्शुरन्स कंपनीला व संचालक (नियोजन व प्रक्रिया) कृषी आयुक्तालय पुणे यांना १७ ऑक्टोबर २०२५ रोजी पत्र पाठवून त्यात वस्तुस्थिती मांडली ती अशी....विसंगत माहितीसन २०२४-२५ या वर्षात रायगड जिल्ह्यात आंबिया बहर अंतर्गत ५२३५ शेतकऱ्यांनी एकूण ३९८१ हेक्टर इतक्या क्षेत्रासाठी विमा उतरविला आहे. स्वयंचलित हवामान केंद्राच्या माहितीच्या आधारे व योजनेच्या शासन निर्णयानुसार जे ट्रिगर व स्कायमेटकडून प्राप्त हवामानाचा डाटा यावरून निश्चित केलेली रक्कम यांच्यात विसंगती दिसून येत आहे. तरी आपण स्कायमेटकडून प्राप्त हवामानाच्या माहितीच्या आधारे पुनश्च तपासणी करून अचूक विमा रक्कम निश्चित करावी व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी असे सुस्पष्ट पत्र दिले..Crop Insurance Issue: पीक कापणी प्रयोगानंतर आता विमा भरपाईस दिरंगाई .या काळात दिवाळी असल्यामुळे हे काम पुढे काही सरकले नाही. आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी जे विम्याचे कव्हर घेतले आहे, त्यात पूर्ण नुकसान भरपाईची रक्कम एक लाख ७० हजार आहे. तर गारपिटीचे स्वतंत्र विमा कव्हर ५७ हजार आहे. गारपिटीबाबत विमा उतरविण्याचे प्रमाण बोटावर मोजण्याइतके असले तरी उर्वरित ट्रिगरच्या मानाने या वर्षीचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी एक लाख रुपयाहून अधिक नुकसान भरपाई मिळण्यास कोणतीच हरकत नव्हती..विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३ हजार शेतकऱ्यांना ७० कोटी रुपये नुकसान भरपाई दिवाळीपूर्वीच प्राप्त झाली. वास्तविक हवामान धोका संपल्यानंतर म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात अनुदान प्राप्त व्हावयास हवा. सहा महिन्यांचा मोठा कालावधी लोटून गेला असला, तरी शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागले. त्यात या वर्षीचा विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ ही आता संपली आहे..Crop Insurance: रब्बी हंगामात शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ.जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशरायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांवरील या अन्यायाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने कृषी आयुक्तालयातील सांख्यिकी विभाग, संचालक प्रक्रिया नियोजन, यांच्याकडे अभ्यासपूर्ण पाठपुरावा केला. यापुढे जाऊन त्यांनी कृषी आयुक्तांचे देखील या जिव्हाळ्याच्या प्रश्नात लक्ष वेधले. या सर्वांचा परिणाम व कृषी आयुक्तालयाच्या सूचनेने कोकण विभागाचे कृषी सहसंचालक यांचे बरोबर ठाणे येथे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची महत्त्वाची बैठक झाली..विमा भरपाईसाठी मोठी दिरंगाई व स्कायमेटकडून प्राप्त हवामानाच्या माहितीच्या आधारे पुनश्च तपासणी करून अचूक विमा रक्कम निश्चित करणे व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे यासाठी सहसंचालक कृषी यांनी रायगडचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यस्तरीय समितीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिले. या पत्राची दखल घेऊन रायगडचे जिल्हाधिकारी यांनी २० नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हास्तरीय समितीची महत्त्वाची बैठक आयोजित केली..या बैठकीत आंबा उत्पादक संघाच्या वतीने कंपनीला शासनाने निर्देश देऊन देखील कंपनीने एडब्ल्यूएस ट्रीगर प्रत्येक महसूलला का लावले? यांची माहिती मोठा कालावधी लोटून देखील जमा केली नव्हती. ही गंभीर बाब जिल्हाधिकारी यांचा निदर्शनास आम्ही आणली. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची तातडीने दखल घेऊन जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सुधारित ट्रिगर (प्रमाणके)नुसार विमा भरपाई देण्याचे आदेश युनिव्हर्सल सोम्पो इन्शुरन्स कंपनीला दिले व सदर फळपीक विमा योजना राबविताना स्कायमेट प्रमाणकांचा वापर कंपनीने वेळोवेळी करावा, जर अचूक प्रमाणकांवर नुकसान भरपाई दिली गेली नाही तर इथून पुढे संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी सक्त ताकीद दिली..परिणाम जी कंपनी आपल्या कर्तव्यापासून दूर जात होती त्यांनी दोन-तीन दिवसांत सर्व मंडलनिहाय डाटा जमा करून तो शासनाला सादर केला. त्यामुळे मागील आठवड्यापासून शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पैसे अंशतः मिळण्यास सुरुवात झाली आहे. अर्थात, स्वयंचलित हवामान केंद्रे बंद असल्यामुळे त्या महसूल मंडलातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत आहे, त्याला पर्यायी हवामान केंद्रे कळविण्यात येतात, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते. भविष्यात रायगडच्या शेतकऱ्यांचा इतर जिल्ह्यांप्रमाणेच प्रिमीयम समान असला पाहिजे व शेतकऱ्यांची हक्काची नुकसान भरपाई वेळेत मिळायला हवी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आश्वासित केले आहे.९५९४८८४६६६(लेखक महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादकसंघाचे अध्यक्ष आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.