Kharif Fertilizers Management : खरीप हंगामातील पिकांना द्या संतुलित खते

Kharif Season : खरीप पिकांच्या लागवडीमध्ये योग्य जमिनीत, योग्य वेळी, योग्य अंतरावर पेरणीसह खत व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. पिकाच्या वाढीसाठी योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य खतांची मात्रा देणे आवश्यक आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture

सोयाबीन

शेणखत किंवा कंपोस्ट खत : हेक्टरी १० टन

शिफारशीत रासायनिक खतमात्रा

५०:७५:४५ किलो (नत्र:स्फुरद:पालाश) अधिक २० किलो गंधक अधिक २५ किलो झिंक सल्फेट अधिक १० किलो बोरॅक्स प्रति हेक्टर प्रमाणात द्यावे.

पीक २० ते २५ दिवसांचे असताना सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिवळे पडण्याची शक्यता असते. त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी

शेंगा लागण्याच्या अवस्थेत १९:१९:१९, तर शेंगा भरण्याच्या अवस्थेत ०:५२:३४ या विद्राव्य

खतांची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा.

भुईमूग

शेणखत किंवा कंपोस्ट खत : हेक्टरी १० टन.

शिफारशीत रासायनिक खतमात्रा (प्रति हेक्टर)

२५:५० किलो (नत्र:स्फुरद) अधिक जिप्सम ४०० किलो प्रति हेक्टर प्रमाणात (पेरणीवेळी आणि आऱ्या सुटताना प्रत्येकी २०० किलो प्रति हेक्टरी द्यावे)

सूर्यफुल

शेणखत किंवा कंपोस्ट खत : हेक्टरी १० ते १२ टन.

शिफारशीत रासायनिक खतमात्रा (प्रति हेक्टर)

बागायती लागवड

६०:६०:६० किलो (नत्र:स्फुरद:पालाश) किलो प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे. त्यापैकी नत्राची अर्धी मात्रा म्हणजेच ३० किलो नत्र, तर स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीवेळी द्यावी. उर्वरित नत्राची मात्रा म्हणजेच ३० किलो नत्र पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.

गंधकाची कमतरता असल्यास गंधक हेक्टरी २० किलो प्रमाणे शेणखतात मिसळून द्यावे.

कोरडवाहू लागवड

५०:२५:२५ किलो (नत्र:स्फुरद:पालाश) प्रति हेक्टर प्रमाणात द्यावे.

Agriculture
Fertilizers Management : खत व्यवस्थापनासह पीक संरक्षणावर भर

तीळ

शेणखत किंवा कंपोस्ट खत ः हेक्टरी ५ टन

शिफारशीत खतमात्रा

पेरणीवेळी २५ किलो नत्र आणि पीक तीन आठवड्याचे झाल्यानंतर २५ किलो नत्राची मात्रा द्यावी.

जमिनीत गंधकाची कमतरता असल्यास पेरणीवेळी हेक्टरी २० किलो गंधक द्यावे.

बाजरी

शेणखत किंवा कंपोस्ट खत : हेक्टरी ५ टन

शिफारशीत खतमात्रा : (प्रति हेक्टर)

हलकी जमीन : ४०:२०:२० किलो (नत्र:स्फुरद:पालाश)

मध्यम जमीन : ५०:२५:२५ किलो (नत्र:स्फुरद:पालाश) त्यापैकी पेरणीवेळी नत्राची अर्धी मात्रा (२५ किलो नत्र) आणि संपूर्ण स्फुरद व पालाशची मात्रा द्यावी. तर उर्वरीत नत्राची मात्रा म्हणजेत २५ किलो नत्र पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.

खरीप ज्वारी

शेणखत किंवा कंपोस्ट खत ः हेक्टरी ५ टन.

शिफारशीत खतमात्रा (प्रति हेक्टर)

१००:५०:५० किलो (नत्र:स्फुरद:पालाश).

पेरणीवेळी अर्धे नत्र (५० किलो), संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी उर्वरित अर्धे नत्र (५० किलो) द्यावे.

तूर

शेणखत किंवा कंपोस्ट खत ः हेक्टरी ५ टन

शिफारशीत खतमात्रा (प्रति हेक्टर)

पेरणीवेळी २५:५०:०० किलो (नत्र:स्फुरद:पालाश) किंवा १२५ किलो डीएपी प्रति हेक्टर प्रमाणात द्यावे.

पेरणीच्या वेळी हेक्टरी ३० किलो पालाश म्हणजेच ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिल्यास पिकामध्ये रोगप्रतिकारक्षमता वाढून उत्पादन वाढण्यास मदत होते.

पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना, १९:१९:१९ या खताची (१ ते २ टक्के) फवारणी करावी.

सिंचनाचे पाणी सोय नसेल तर फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरिया) किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत २ टक्के पोटॅशिअम नायट्रेटची (१३:०:४५) एक फवारणी करावी.

मूग आणि उडीद

शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी ५ टन.

शिफारशीत खतमात्रा (प्रति हेक्टर)

२०:४० किलो (नत्र:स्फुरद) किंवा १०० किलो डीएपी पेरणीच्या वेळी द्यावे किंवा युरिया ३० किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट २५० किलो प्रति हेक्टरी द्यावे. पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी ३० किलो पालाश म्हणजेच ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिल्यास पिकामध्ये रोगप्रतिकारक्षमता वाढून उत्पादन वाढते.

महत्त्वाची सूचना : १५ जुलैनंतर मूग व उडीद पिकाची पेरणी करू नये.

कुळीथ आणि मटकी

शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी ५ टन.

शिफारशीत खतमात्रा (प्रति हेक्टर)

पेरणीवेळी १२.५:२५ किलो (नत्र:स्फुरद) किंवा ७५ किलो डीएपी प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे.

Agriculture
Soybean Crop Fertilizers : सोयाबीन पिकास द्या संतुलित खते

चवळी

शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी ५ टन.

शिफारशीत खतमात्रा

पेरणीच्या वेळी २५:५० किलो (नत्र:स्फुरद) किंवा डीएपी १२५ किलो प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे.

राजमा

शेणखत किंवा कंपोस्ट खत : हेक्टरी ५ टन

शिफारशीत खतमात्रा (प्रति हेक्टर)

पेरणीवेळी ३०:८० किलो (नत्र:स्फुरद) किंवा डीएपी १७० किलो प्रति हेक्टरी द्यावे.

पीक २० दिवसांचे झाल्यावर नत्राचा दुसरा हप्ता ३० किलो म्हणजेच ७० किलो युरिया प्रति हेक्टरी द्यावा.

कापूस

शेणखत किंवा कंपोस्ट खत ः बागायती लागवडीस १० टन, तर कोरडवाहू- बागायती ५ टन प्रति हेक्टर.

शिफारशीत रासायनिक खतमात्रा

संकरीत कापूस : १००:५०:५० (नत्र:स्फुरद:पालाश) किलो प्रति हेक्टरी

सुधारित कापूस : ८०:४०:४० (नत्र:स्फुरद:पालाश) किलो प्रति हेक्टरी

बी. टी. कापूस : १२५:६५:६५ (नत्र:स्फुरद:पालाश) किलो प्रति हेक्टरी

खते देण्याची वेळ

पेरणीच्या वेळी २० टक्के नत्र आणि स्फुरद, पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० टक्के नत्र आणि पेरणीनंतर ६० दिवसांनी नत्राची उर्वरित ४० टक्के मात्रा द्यावी.

तसेच मॅग्नेशिअम, गंधक, लोह, जस्त, मॅगेनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील पिकास आवश्यकता असते. त्यासाठी गंधक २० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट २० किलो, झिंक सल्फेट २५ किलो, बोरॅक्स ५ किलो प्रति हेक्टरी प्रमाणे द्यावे.

डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(मृद्‍ शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com