Soybean Farming : शेतकऱ्यांची पुन्हा सोयाबीनलाच पसंती

Rain Update : यंदा मॉन्सूनच्या सुरुवातीपासूनच वरुणराजाची कृपा शेतकऱ्यांवर राहिली. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली
Soybean Farming
Soybean FarmingAgrowon
Published on
Updated on

Beed News : यंदा मॉन्सूनच्या सुरुवातीपासूनच वरुणराजाची कृपा शेतकऱ्यांवर राहिली. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली, यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परिणामी पेरण्या सुद्धा वेळेत करण्यात आल्या.

गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला भाव कमी असून सुद्धा शेतकऱ्यांकडून यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा सोयाबीन पिकाला पसंती देण्यात आली आहे. तर त्या खालोखाल कापसाचा पेरा झालेला आहे. सद्य स्थितीत पेरण्या पूर्णत्वाकडे आल्या असून ९८.६ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Soybean Farming
Cotton, Soybean Madat : कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना मिळणार १० हजार रुपये; कोणते शेतकरी असतील पात्र ?

यंदा पाऊस जरी वेळेत आला असला तरी गत वर्षीच्या अनुभवावरून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते की, १०० मिमी पावसाची नोंद झाल्या शिवाय पेरणी करू नये. परंतु सर्व तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. समाधानकारक पाऊस झाल्याने पेरण्या अगदी वेळेत पूर्ण झाल्या.

मागील वर्षी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांना पावसाने पाठ दाखवली होती. परिणामी दोन्ही हंगामातील पिके हातातून गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. यंदा मात्र पावसाची स्थिती चांगली असून पिके देखील चांगली आली आहेत. तर मागील दोन वर्षांपासून सोयाबीनला भाव नसल्यामुळे सोयाबीन आजही शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. परंतु यंदा सुद्धा शेतकऱ्यांनी पहिली पसंती सोयाबीनलाच दिली आहे.

Soybean Farming
Soybean and Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील नरमाई कायम

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी एकूण ७ लाख ८५ हजार ७८६ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. त्यापैकी जवळपास ७ लाख ७४ हजार ८४८ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. तर यंदा शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन सोबतच उडीद आणि तूर या पिकांना पसंती दिली आहे. तसेच मुग आणि बाजारी या पिकांचा देखील चांगला पेरा झालेला आहे.

...अशी झाली लागवड

(क्षेत्र हेक्टरमध्ये)

खरीप ज्वारी ५४०

बाजरी ३११८४

मका ६९४४

तूर ४९५५८

मूग ११५५१

उडीद ४८७५४

भुईमूग ९८२

तीळ २३८

सोयाबीन ३५७२४६

कापूस २६६९११

कारळ २४

सूर्यफूल ०४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com